आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडाद्वारे निवृत्तीचे नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवृत्ती आणि निवृत्तिवेतन या एकमेकांना पर्यायी बाबी आहेत. जेव्हा एखादा निवृत्तीसाठी बचतीचा विचार करतो तेव्हा तो पेन्शन प्लॅन शोधणे सुरू करतो. तुम्हाला म्युच्युअल फंडांबाबत माहिती असेल आणि निवृत्तिनंतरचे नियोजन उत्तम जमत असेल तर म्युच्युअल फंड हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. या पर्यायात उत्तम व्यवस्थापनास वाव असतो. यात लवचिकता असते. कराच्या बाबतीत तसेच इतर बाबतीत उत्तम निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल..
1. एक्युम्युलेशन स्टेज : या स्थितीत एखादी व्यक्ती निवृत्तीसाठी गुंतवणूक करते. आपली जोखीम घेण्याची तयारी, कालावधी आणि म्युच्युअल फंडांची रचना समजल्यानंतर अशी गुंतवणूक होत असते. तुम्हाला केवळ अँसेट अलोकेशनबाबत निर्णय घ्यावा लागतो. इक्विटी, डेट, सोने आणि रिअल इस्टेट यात कॉम्बो गुंतवणूक करता येते. निवृत्तीसाठी करण्यात येणारी गुंतवणूक दीर्घकालीन असते त्यामुळे डायव्हर्सिफाइड इक्विटी म्युच्युअल फंडांतून निवड करता येते. यात लार्ज आणि मिड कॅप फंड असे मिर्शण असू शकते. डेट श्रेणीत दीर्घकालीन गुंतवणूक करता येते. सोन्याच्या बाबतीत गोल्ड ईटीएफ , गोल्ड सेव्हिंग्ज फंड असे पयार्य असू शकतात. रिअल इस्टेटच्या बाबतीत विभिन्न रिअल इस्टेट पोर्टफोलिओत गुंतवणूक करता येते.
2. प्रिझव्र्हेशन आणि डिस्ट्रिब्युशन स्थिती : या स्थितीत गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवू इच्छितो. यासाठी परंपरागत पद्धतीचा अंमल करण्याची आवश्यकता असते. अशात शॉर्ट टर्म डेट फंड, फिक्स्ड मॅच्युरिटी योजना, मंथली इन्कम योजना अशा सुरक्षित पर्यांयाची या स्थितीत निवड करता येते. मात्र, या वयात नियमित उत्पन्नाचीही गरज असते. यासाठी सिस्टिमॅटिक विड्रॉल किंवा लाभांश पेआउट हे पर्याय आहेत. सिस्टिमॅटिक विड्रॉलसाठी म्युच्युअल फंड कंपनीला माहिती द्यावी लागते. मग फंड कंपनी संबंधित गुंतवणुकीतील उपलब्ध युनिटची विक्री करून एक ठराविक रक्कम देणे सुरू करतात. यामुळे गुंतवणूकदारांची नियमित उत्पन्नाची गरज पूर्ण होते.
म्युच्युअल फंड पेन्शन योजनेपेक्षा उत्तम का ?
1. जास्त लवचिकता : म्युच्युअल फंडात पेन्शन प्लॅनप्रमाणे प्रीमियमच्या नियमित भरणाचे बंधन नसते. तसेच मध्येच पूर्ण किंवा अंशिक स्वरूपात पैसे काढण्याची आवश्यकता नसते. गुंतवणूक केव्हाही थांबवता येते तसेच दंडाविना रक्कम काढता येते.
2. कर सुलभ साधन : इक्विटी म्युच्युअल फंडातून मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा पूर्णपणे करमुक्त असतो. डेट म्युच्युअल फंडांच्या बाबतीत इंडेक्सेशनपूर्वी 10 टक्के आणि इंडेक्सेशननंतर 20 टक्के दर असतो. बहुतेक वेळा इंडेक्सेशन अँडजेस्टमेंटनंतर भांडवली नफा शून्यावर येतो. अशा रीतीने सिस्टिमॅटिक विड्रॉल, पेन्शन प्लॅनच्या तुलनेत हा पर्याय कराच्या बाबतीत किफायतशीर सिद्ध होतो. त्याद्वारे मिळणारा परतावा आपल्या उत्पन्नात मिसळूनही 100 टक्के करपात्र असतो.
3. पारदर्शक आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल : म्युच्युअल फंडाची निवड करण्याचे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असते. यात फंड व्यवस्थापक, गुंतवणुकीचे उद्देश, धोरण, मागील परतावा, जोखीम यांची माहिती खुली असते. या उलट इतर पेन्शन उत्पादने, योजना इतक्या पारदर्शक नसतात. पेन्शन प्लॅनचा एक फायदा म्हणजे यात गुंतवणुकीला एक प्रकारची शिस्त असते. त्यात केवळ पेन्शनसाठीच गुंतवणूक केली जाते. मात्र ही शिस्त तुम्ही तुमच्या अंगी बाणवली तर म्युच्युअल फंड निवृत्तीसाठी उत्तम योजना बनू शकतात.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.