आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनव्हेस्टमेंट : अशी आहे राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या गुंतवणूकदारांसाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीमची (आरजीईएसएस) सुरुवात झाली. मात्र, यातील क्लिष्टतेमुळे गुंतवणूकदार त्यापासून दूर राहिले. यंदाच्या अर्थसंकल्पात यात काही बदल करून ही योजना अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या योजनेविषयी जाणून अधिक जडाणून घेऊया..

आरजीईएसएस काय आहे : या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेअर्सची खरेदी-विक्री न करणार्‍या गुंतवणूकदारांना एक ठरावीक रकमेपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळणार आहे.या अंतर्गत काही विशिष्ट शेअर्स, ईटीएफ किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. शेअर बाजारात छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवून स्थिरता आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.

कोण करू शकतो गुंतवणूक : ज्यांनी आतापर्यंत डी-मॅट खाते उघडलेले नाही. तसेच डी-मॅट खाते असूनही अजून त्यावर शेअर्सची खेरदी-विक्री केलेली नसेल असे गुंतवणूकदार या योजनेत सहभागी होऊ शकतात. यासाठी गुंतवणूकदारांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखावरून 12 लाख रुपये करण्यात आले आहे.

कोठे करू शकता गुंतवणूक : सेबीच्या निर्देशानुसार, आरजीईएसएस योजनेअंतर्गत बीएसई 100 किंवा सीएनएक्स 100 मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स, आरजीईएसएस म्युच्युअल फंड्स, ईटीएफ आणि काही खास कंपन्यांचे आयपीओ यात गुंतवणूक करता येते.

लॉ-इन कालावधी : या योजनेसाटी तीन वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. पहिले वर्ष फिक्स्ड लॉक इन पिरियड असतो. या काळात गुंतवणुकीतील रक्कम विकता येत नाही. दुसर्‍या वर्षापासून लॉक इन फ्लेक्झिबल असतो. म्हणजे, गुंतवणूक विकता येते, मात्र त्यातील किमान रक्कम गुंतवणूक म्हणून ठेवावी लागते. करबचतीची रक्कम तसेच पोर्टपोलिओ मूल्य यापैकी जी रक्कम कमी असेल त्यानुसार ही किमान रक्कम ठेवावी लागते. या अठीचे पालन न केल्यास करबचतीची सुविधा काढून घेती जाते.

प्राप्तिकरात सवलत : प्राप्तिकर कायद्यात समावेश करण्यात आलेल्या 80 सीसीजी या नव्या कलमानुसार या योजनेत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर 50 टक्के कर सवलत मिळते. यासाठी गुंतवणुकीची र्मयादा 50 हजार रुपये आहे. यावर कमाल 25 हजार रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळतो. ज्यांना कर बचतीचा लाभ घ्यायचा नाही त्याच्यासाटी गुंतवणुकीवर र्मयादा नाही. ही कर सवलत कलम 80 सीव्यतिरिक्त मिळते.

तीन वर्षांपर्यंत करा गुंतवणूक : यंदाच्या अर्थसंकल्पातील बदलानुसार आता या योजनेत तीन वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. या आधी या योजनेत केवळ पहिल्या वर्षीच गुंतवणूक करता येत होती.

कर सवलत हे या योजनेचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, शेअर बाजाराचा संबंध असल्याने शेअर खरेदी-विक्री करण्याची जोखीम वाढते. जर गुंतवणुकीसाठी शेअर्सची निवड चुकली तर गुंतवणूकदारांसाठी ते जोखमीचे ठरू शकते. अशा स्थितीत गुंतवणुकीचे मूलभूत नियम कायम लक्षात ठेवावेत आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी.

लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.

manikaran.singal@dainikbhaskargroup.com