आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - यंदाच्या पहिल्या तिमाही सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंनी नकारात्मक परतावा दिला आहे. गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित मानण्यात येणा-या या धातूंकडे गुंतवणूकदारांचा ओढा असतो. मात्र, यंदा मार्चपर्यंत सोन्याचे भाव 7 टक्क्यांनी, तर चांदीच्या किमती 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. याउलट गोल्ड एक्स्चेंज फंडांनी अर्थात गोल्ड ईटीएफने चांगला परतावा दिला आहे. ईटीएफ फंडांकडून मिळत असणारा सोन्यासारखा परतावा पदरात पाडून घेण्यासाठी अनेक
गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ फंडाकडे वळल्याचे चित्र आहे.
कोटक म्युच्युअल फंडाच्या प्रमुख (फिक्स्ड इन्कम) लक्ष्मी अय्यर यांनी सांगितले की, सध्या गोल्ड ईटीएफ फंड गुंतवणूकदारांचे मुख्य आकर्षण आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या फिजिकल खरेदी व विक्रीत गुंतवणूकदारांच्या परतावा मूल्यात 10 ते 15 टक्के नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफकडे वळले आहेत. रिद्धी- सिद्धी बुलियनचे पृथ्वीराज कोठारी यांच्या मते, फिजिकल सोने, चांदीच्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना सध्या चांगला परतावा मिळत नसल्याचे चित्र आहे. सोने व चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा गोल्ड ईटीएफ फंडांकडे वळवला आहे. पूर्वी असे चित्र केवळ मोठ्या शहरांत दिसायचे. आता छोट्या शहरांतूनही गोल्ड ईटीएफला चांगली मागणी आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, गेल्या सात महिन्यांच्या काळात इतर गुंतवणूक साधनांच्या तुलनेत दुप्पट परतावा दिला आहे.
ईटीएफचे आकर्षण
० गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती सात टक्के घसरल्या आहेत.
० याच काळात चांदीच्या भावात झाली आहे दहा टक्के घसरण
० गोल्ड ईटीएफ देत आहेत गुंतवणुकीवर चांगला परतावा
सोन्याची घसरण
सोन्याच्या बाबतीत मात्र उलटे चित्र आहे. जानेवारीच्या प्रारंभी सोने 31,700 रुपये तोळा होते. आता हा भाव 29,500 रुपयांपर्यंत घसरला आहे. याचाच अर्थ सोन्याच्या किमती तोळ्यामागे 2000 रुपयांनी घसरल्या आहेत. सोन्यात नजीकच्या काळात तेजीचे काहीच संकेत नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.