आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Europa Economic Recession Impact On India, World Bank Comment

जागतिक बॅंकेने आणखी एकदा दिला आर्थिक मंदीचा इशारा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन: आर्थिक मंदीचे भूत पुन्हा एकदा सर्व देशांच्या मानगुटीवर बसण्याची तयारी करत असून त्याला सामोरे जाण्यासाठी विकसनशील देशांनी सज्ज राहावे, असा इशारा जागतिक बॅंकेने बुधवारी दिला आहे. यूरोपात सध्या मंदीचे सावट आहे. त्याचा परिणाम भारतासह ब्राझीलसारख्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे यूरोपीय देश जर गुंतवणूक करण्यात कमी पडले तर परिस्थिती आणखीच बिकट होईल, असे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले आहे.
जागतिक बॅंकेनुसार वर्ष 2012 मध्ये आर्थिक अर्थव्यवस्था विकास दर 2.5 टक्के राहील. यापूर्वी 3.6 टक्क्यांनी विकास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, यूरोपातील संकटाचा मोठा परिणाम जगातील बहुतेक विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर जाणवणार असल्याचे बॅंकेने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.
जागतिक बॅंकेच्या 'ग्लोबल इकनॉमिक प्रोस्पेक्ट्स (जीईपी) 2012' या अहवालानुसार विकासशील तसेच समृद्ध देशांनीही आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे सांगणारा आहे. यूरोपीय आर्थिक संकटामुळे विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला येण्याची शक्यता आहे. परिणामी आर्थिक विकास दरही कमी राहील.
यूरोपीय देशांच्या बाबतील जागतिक बॅंकेने काही निष्कर्ष काढले आहेत. ते म्हणजे वर्ष 2012 मध्ये उत्पादन 0.3 टक्के घसरणार आहे. तर 2013 मध्ये त्यात 1.1 टक्क्याने वाढ होईल. त्यामुळे यूरोपीय आर्थिक संकटाचा विकासशील आणि समृद्ध देशांवर व्यापक परिणाम जाणवणार आहे.
युरोपवरून धडा घ्या, चांगले आर्थिक व्यवस्थापन करा- मुखर्जी
तेजी-मंदी आणि गुंतवणूकदार
आर्थिक आपत्तीच्या मुकाबल्यासाठी सरकार सज्ज