आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डिझेलवरील तोटा नियंत्रणात आल्याने त्याच्या किमती आगामी काळात कमी होतील, अशी आशा होती. परंतु त्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करून नफ्याचा लाभ उठवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याने ही आशा मावळली आहे. ब्रँड नसलेल्या डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
सध्या त्याच्या विक्रीवर सरकारी तेल कंपन्यांना ३४ पैसे प्रतिलिटर फायदा होत आहे. तोटा कमी झाल्याने डिझेल नियंत्रणमुक्त करण्याची मागणी कंपन्यांनी केली होती. जर त्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असता तर कंपन्यांकडून त्याचे दर कमी केले जाण्याची शक्यता होती. परंतु आता ही शक्यता धूसर झाली आहे.