आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Excise Duty On Petrol diesel Raised, Prices Shoot Up By Rs. 1.50 Per Litre

बुरे दिन: मोदी सरकारने केली अबकारी करात वाढ, दीड रुपयाने महागले पेट्रोल-डिझेल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयाने कपात होण्याचे संकेत मिळत असताना देशातील जनतेसाठी वाईट बातमी आहे. केंद्र सरकारने अकबरी करात वाढ केल्याने पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर दीड रुपयाने महागले आहे. सरकारच्या कठोर न‍िर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा भुर्दंड बसणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने आज (गुरुवारी) अचानक पेट्रोल- डिझेलवरील अबकारी करात जवळपास दीड रुपयाने प्रतिलिटर वाढ केली. अनब्रांडेड डिझेलवरील अकबरी कर वाढवून 2.96 रूपये तर ब्रांडेड डिझेलवरील अकबरी 5.25 रूपये केला आहे. तसेच अनब्रांडेड पेट्रोलवरील अकबरी कर 2.70 रूपये तर ब्रांडेड पेट्रोलवरील अकबरी कर 3.85 रूपये केला आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने घसरत असल्याने पेट्रोलसह डिझेलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून अनेक वेळा कमी झाले होते.