आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्साइड लाइफ यंदा करणार 20 हजार एजंटांची भरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयुर्विमा क्षेत्रातील एक्साइड लाइफ इन्शुरन्सची देशभर विस्ताराची योजना आहे. त्या अंतर्गत कंपनी यंदा 20 हजार एजंटांची भरती करणार आहे. कंपनीचे मुख्य संचालक तसेच सीईओ क्षितिज जैन यांनी सांगितले, सध्या कंपनीचे 35 हजार एजंट आहेत आणि चालू आर्थिक वर्षात आणखी 20 हजार एजंटांची भरती करण्याचा कंपनीचा विचार आहे.
जैन म्हणाले, दक्षिण भारतात कंपनी इतर पाच प्रमुख जीवन विमा कंपन्यांशी सहभागी झाली आहे. मात्र, देशाच्या इतर भागांत कंपनीची पोहोच कमी आहे. आता कंपनीचे नाव बदलून देशभर विस्ताराची योजना तयार करण्यात आली आहे. कंपनी आयएनजी वैश्य बँकेच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाची विक्री सुरूच ठेवणार आहे. मात्र, एजंट या माध्यमाकडे आता विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यानुसार देशभरात एजंटांची भरती करण्यात येणार आहे.
आयएनजी वैश्य लाइफ इन्शुरन्स या पूर्वाश्रमीच्या कंपनीचे नाव बदलून आता एक्साइड लाइफ इन्शुरन्स असे करण्यात आले आहे. जैन यांनी याचा उल्लेख करतानाच सांगितले, एक्साइड इंडस्ट्रीज बॅटरीच्या क्षेत्रातील शंभर वर्षे जुनी कंपनी आहे. ते लक्षात घेऊन नाव बदलण्यात आले आहे.
कंपनीच्या नफ्यात दुप्पट वाढ : जैन यांनी सांगितले, सध्या कंपनीचा सात हजार कोटी रुपयांचा कारभार आहे आणि वर्षाकाठी यात 10 टक्क्यांहून जास्त वाढीची कंपनीची अपेक्षा आहे. कंपनीने मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 53 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या 26 कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा दुप्पट आहे.
सध्या कंपनीचे 35 हजार एजंट आहेत आणि चालू आर्थिक वर्षात आणखी 20 हजार एजंटांची भरती करण्याचा कंपनीचा विचार आहे. आयएनजी वैश्य लाइफ इन्शुरन्स या पूर्वाश्रमीच्या कंपनीचे नाव बदलून आता एक्साइड लाइफ इन्शुरन्स असे करण्यात आले आहे.
क्षितिज जैन, मुख्य संचालक व सीईओ एक्साइड लाइफ