आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Expectation Increases Frome Reserve Bank Governor Raghuram Rajan

र‍िझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून वाढल्या अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती येताच रघुराम राजन यांनी घेतलेल्या सुधारणावादी भूमिकेचे तमाम उद्योगजगताने मनापासून स्वागत केले आहे. आगामी काळात रिझर्व्ह बॅँक विकासाला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात करून नाणेनिधी धोरण सुसह्य करेल, असा विश्वास कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने व्यक्त केला आहे.
रघुराम राजन यांनी आपल्या भाषणामध्ये सुधारणावादी भूमिका स्पष्ट करून अर्थव्यवस्थेच्या वाढीला संजिवनी देण्यासाठी रिझर्व्ह बॅँक ठोस पावले उचलण्याचे संकेत एकप्रकारे दिले असल्याचे मत सीआयआयचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले आहे. राजन यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बॅँक आता नाणेनिधी धोरण अधिक सुसह्य करून त्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळून पुन्हा आर्थिक वृध्दीची शिडी सर करता येऊ शकेल असा विश्वासही गोपालकृष्णन यांनी व्यक्त केला.
रुपयाचे अमूल्यन, घरंगळत असलेला भांडवल बाजार अशा आर्थिक मरगळीच्या वातावरणामध्ये रघुराम राजन यांनी बुधवारी रिझर्व्ह बॅँकेचे 23 वे गव्हर्नर म्हणून सूत्रे आपल्या हाती घेतली. नवे रिझर्व्ह बॅँक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच रघुराम राजन यांनी सूत्रे हाती येताच अनेक प्राथमिक उपाययोजना जाहीर करताच शेअर बाजाराची मरगळ कुठल्या कुठे पळाली.


आरबीआय व्याजदर कमी करेल:प्रफुल्ल पटेल
आरबीआयच्या गव्हर्नरपदाची सूत्रे राजन यांच्याहाती येताच अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नवीन गव्हर्नर व्याजदर कमी करून बाजारातील पतपुरवठ्याचा ओघ वाढवतील आणि पुन्हा अर्थव्यवस्थेला वृध्दीच्या नव्या शिखरावर घेऊन जातील अशी आशा व्यक्त केली आहे.