आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Experts Says Buying Gold Will Profitable In Future

दिवाळीत सोने 30 हजार!, तज्ज्ञाच्या मते, टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करणे फायद्याचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एकीकडे अमेरिकेसह जगातील सर्व अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत आहेत, जे सोन्याच्या किमती घसरणीचे चिन्ह मानले जाते, तर दुसरीकडे इराकपासून ते युक्रेनपर्यंत राजकीय अस्थिरता व युद्धजन्य परिस्थितीने या घसरणीला लगाम लावला आहे. आता विचार करा, सोन्यात गुंतवणूक करणारे आणि व्यापार्‍यांसाठी ही वेळ अत्यंत कसोटीची मानली जात आहे. दर तासाला जगभरातून येणार्‍या वृत्तांनुसार सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत.

अशा परिस्थितीत सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, देशातील सराफ्यात दिवाळीपर्यंत सोने तोळ्यामागे 30 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने किमतींच्या बाबतीत अनिश्चिततेचे वातावरण टिकून राहील, मात्र त्याच वेळी देशातील सणांचा हंगाम, दिवाळी व धनत्रयोदशी यामुळे सोन्याच्या किमतीची झळाळी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया सोन्यातील तेजीला बळ देणारा राहील.

भारतात का येणार सोन्यात तेजी
डॉलरच्या तुलनेत सध्या रुपया 61 च्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात रुपयात आणखी घसरणीची शक्यता आहे. तसे पाहिले तर डॉलर इंडेक्स 10 महिन्यांच्या उच्चांकी पातळीत आहे. त्यामुळे रुपयावर दबाव राहील. रुपया 62 च्या पुढे जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

युक्रेन, रशिया, इराक आणि गाझामध्ये तणाव वाढला आहे. अमेरिका आणि युरोपीय समुदायातील वस्तूंच्या आयातीवर रशियाने निर्बंध लादले आहेत. अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या निर्बंधाला रशियाने हा जवाब दिला आहे. यापूर्वी अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी रशियातील बँक, संरक्षण आणि तेल उद्योगावर निर्बंध लादले होते.

युरोपातील अनेक देशांची स्थिती डळमळीत आहे. नुकतेच अर्जेंटिना दिवाळखोरी जाहीर केली आहे. तसेच इटलीची स्थिती खराब आहे. यामुळे सुरक्षित उपाय म्हणून सोन्याला मागणी वाढू शकते.

नोमुराचा अंदाज - एक वर्षात सेन्सेक्स गाठणार 30,310 चा टप्पा
मुंबई - जागतिक स्तरावर शेअर बाजाराची समीक्षा करणार्‍या नोमुरा या एजन्सीने आगामी ऑगस्टच्या अखेरपर्यंत मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सूचकांक सेन्सेक्स 30,310 अंकांच्या शिखरावर पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. नोमुराच्या अहवालानुसार नवे लक्ष्य मंगळवारच्या सेन्सेक्सच्या 25880.77 या पातळीपेक्षा 17 टक्क्यांनी जास्त आहे.

नोमुराच्या अहवालानुसार या काळात, अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, गेल इंडिया, कोल इंडिया लिमिटेड आणि टाटा मोटर्स या समभागांत चांगली तेजी दिसून येईल. नव्या सरकारकडून आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या धोरणांमुळे विकास दराला मिळालेल्या गतीकडे बाजाराचे दुर्लक्ष होत आहे. नोमुराच्या मते, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही वर्षभरात 8000 ही पातळी गाठण्याची शक्यता आहे.
बाजाराचे दुर्लक्ष
नव्या सरकारकडून आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या धोरणांमुळे विकास दराला मिळालेल्या गतीकडे बाजाराचे दुर्लक्ष होत आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.