आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेवरील निर्यात सवलतीला मिळणार मुदतवाढ : पासवान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आर्थिक चणचणीने ग्रासलेल्या कच्च्या साखरेला २०१४-१५ च्या विपणन वर्षात निर्यात सवलत देण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे केंद्रीय अन्नमंत्री रामवलास पासवान यांनी सांगितले. आर्थिक अडचणीमुळे त्रस्त झालेल्या साखर कारखान्यांना शेतक-यांची थकबाकी देता यावी यादृष्टीने केंद्र सरकारने २०१३-१४ आणि २०१४-१५ या विपणन वर्षांसाठी कच्च्या साखरेवर ४० लाख रुपयांपर्यंत निर्यात सवलती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने यंदा फेब्रुवारी महिन्यात घेतला होता. परंतु यंदाच्या सप्टेंबरनंतर या योजनेला मुदतवाढ मिळाली नाही. ऑक्टोबर ते सप्टेंबर हा साखर हंगाम म्हणून ओळखला जातो.

निर्यात साहाय्यता योजना ही दोन साखर हंगामांसाठी दिली जाते. २०१३-१४ साखर वर्षानंतर या योजनेचा फेरआढावा घेण्यात आला. ही आढावा प्रक्रिया सुरू असल्याचे पासवान यांनी सांगितले.
फेब्रुवारी ते मार्च या कालावधीसाठी प्रतिटन ३,३०० रुपये सवलत मुळात निश्चित करण्यात आली होती, पण केंद्र सरकारने प्रत्येक दोन महिन्यांनी सवलतीच्या प्रमाणाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. एप्रिल ते मे या कालावधीसाठी या सवलतीत कपात करून ती प्रतिटन २,२७७ रुपयांवर आणण्यात आली होती. नंतर त्यात पुन्हा वाढ करून ती जून ते जुलैसाठी प्रतिटन ३,३०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. ऑगस्ट ते सप्टेंबरसाठी ही सवलत वाढवून प्रतिटन ३,३७१ रुपयांवर नेण्यात आली.

यंदाच्या हंगामात २० लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

साखर उत्पादन वाढणार
देशातील स्थानिक साखरेची मागणी २४७ लाख टन आहे. केंद्र सरकारने यंदाच्या गाळप हंगामात एकूण २५०.५ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु ‘इस्मा’ या साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणा-या संस्थेने मात्र २५० ते २५५ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षातल्या २४४ लाख टनांच्या तुलनेत यंदाच्या हंगामात २० लाख टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कच्च्या साखरेवरील निर्यात अनुदान कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.