आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Export Of Information Techonology Increases 12 To 14 Percent : Estimat Nascam

माहिती तंत्रज्ञान निर्यातीत 12 ते 14 टक्के वाढ होणार : नॅस्कॉमचा अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्यात पुढील आर्थिक वर्षात 12 ते 14 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणा-या ‘नॅस्कॉम’ या संस्थेने व्यक्त करतानाच जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या धक्क्यानंतर या क्षेत्रात सुधारणा होण्याचे संकेतही दिसत असल्याचे म्हटले आहे.

यंदाच्या वर्षात सॉफ्टवेअर आणि सेवा निर्यात 84 ते 87 अब्ज डॉलर्सच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवरील वाढता खर्च आणि त्याच्याच जोडीला नवीन तंत्रज्ञानाची धरली जात असेली कास यामुळे पुढील वर्षात या उद्योगाच्या वाढीला चालना मिळेल, असा विश्वास ‘नॅस्कॉम’चे अध्यक्ष सोम मित्तल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यंदाच्या आर्थिक वर्षात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या महसुलात 10 टक्क्यांनी वाढ होऊन तो 76 अब्ज डॉलर्सवर जाण्याची अपेक्षा नॅस्कॉमने व्यक्त केली आहे.