आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Export Sector Lag Behind In Front Of Job Creation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या योजनेंतर्गत 10 लाख नोकर्‍यांचे ‘गिफ्ट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवडती योजना असणार्‍या गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट) च्या माध्यमातून 2022 पर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. गुजरात सरकारच्या वतीने तयार होत असलेल्या या प्रकल्पाचा उद्देश आंतरराष्ट्रीय कंपन्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी व सुविधा पुरवण्याचा आहे. जीआयएफटी अर्थात गिफ्टचे एमडी व सीईओ रमाकांत झा यांनी ही माहिती दिली.
झा यांनी सांगितले, गिफ्ट ही नरेंद्र मोदी यांची अत्यंत आवडीची योजना आहे. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा या प्रकल्पावर त्यांचे वैयक्तिक लक्ष होते. त्यांच्या मनातील ही योजना साकारण्यासाठी सर्व जण आता कामाला लागले आहेत. नव्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या प्रकल्पाचा एक भाग आहेत. देशात गिफ्टच्या माध्यमातून 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

गिफ्ट योजना
० गुजरातमधील गांधीनगरनजीक 886 एकर क्षेत्रावर 65,000 कोटींच्या गुंतवणुकीतून गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी-गिफ्ट ही योजना आकारास येत आहे.

० जागतिक वित्तीय सेवा देणार्‍या केंद्राच्या रूपात या प्रकल्पाला विकसित करण्यात येत आहे. यात विविध सेवांचे विशेष आर्थिक सेवा क्षेत्र (सेझ), देशांतर्गत वित्तीय केंद्र आणि याच्याशी संबंधित सामाजिक पायाभूत सुविधा, रचना यांचा यात समावेश राहील.

० तीन टप्प्यांत विकसित होणारी गिफ्ट योजना 2022 पर्यंत पूर्ण होईल. गिफ्ट सिटीत दोन प्रकारची केंद्रे असतील, यात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आणि दुसरे देशांतर्गत वित्तीय केंद्राचा समावेश आहे.

सिंडिकेट बँकेत 5000 जणांना संधी
सिंडिकेट बँक चालू आर्थिक वर्षांत 5000 नव्या कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. यात 2700 अधिकारी स्तराची पदे आहेत. या शिवाय बँकेची 1000 नवे एटीएम लावण्याचीही योजना असल्याचे बँकेचे अध्यक्ष सुधीरकुमार जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, देशभरात बँकेच्या 350 नव्या शाखा उघडण्यात येणार आहेत. विदेशातही काही शाखा उघडण्याचा बँकेचा विचार आहे.
फ्लिपकार्ट देणार 12 हजार जणांना रोजगार
ऑनलाइन वस्तूंची विक्री करणारी फ्लिपकार्ट कंपनी यंदा 12,000 कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. इंटरनेट वापराच्या दृष्टीने भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. वाढती मागणी व कारभार लक्षात घेऊन कंपनीने देशभरात जाळे विणण्याची योजना एक महत्त्वाकांक्षी योजना बनवली आहे. त्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. फ्लिपकार्टचे चीफ पर्सनल ऑफिसर मेकिन माहेश्वरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कंपनी कर्मचार्‍यांची संख्या 13 हजारांंवरून 25 हजारांवर नेणार आहे. कंपनी सर्व श्रेणीच्या पदांची भरती करणार आहे. यात उच्च्पदस्थ ते तांत्रिक नियुक्त्यांना जास्त प्राधान्य राहील. निव्वळ अभियांत्रिकी विभागात 2014 च्या अखेरपर्यंत 1200 जणांची भरती करण्याची कंपनीची योजना आहे.