आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यातीला चांगले दिवस; आयातीत वाढ झाल्याने व्यापार तूट मात्र चिंताजनक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक बाजारपेठेतील मागणी वाढल्यामुळे निर्यातीने गेल्या सहा महिन्यांतील 12.4 टक्क्यांच्या चांगल्या वाढीची नोंद मे महिन्यात करून सुखद धक्का दिला आहे; परंतु दुसर्‍या बाजूला व्यापार तूट मात्र 11.23 अब्ज डॉलर अशा दहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

निर्यातीमधून मिळणारे उत्पन्न आणि आयातीमधून जाणारी रक्कम यातील फरक असलेली व्यापार तूट मागील महिन्यात 10.09 अब्ज डॉलर होती. विशेष म्हणजे गेल्या वर्षातल्या मे महिन्यातील 19.37 अब्ज डॉलरच्या तुलनेतही कमी होती.

अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने आणि तयार कपडे यासारख्या काही प्रमुख क्षेत्रांनी पोषक वाढ नोंदवल्यामुळे महिन्यातील निर्यात वाढून ती अगोदर गेल्या वर्षातल्या याच कालावधीतील 24.9 अब्ज डॉलरवरून 28 अब्ज डॉलरवर गेली आहे. आयात मात्र याच कालावधीत 11.4 टक्क्यांनी घसरून ती 39.23 अब्ज डॉलरवर आली आहे.

यंदाच्या वर्षात एप्रिल ते मे या कालावधीत निर्यातीमध्ये 8.87 टक्क्यांनी वाढ होऊन ती 53.63 अब्ज डॉलरवर, तर आयात 13.16 टक्क्यांनी कमी होऊन 74.95 अब्ज डॉलरची झाली. परिणामी, व्यापार तूट या काळात 21.3 अब्ज डॉलर नोंद झाली आहे. मे महिन्याच्या अगोदर जुलै महिन्यात व्यापार तूट 12.2 अब्ज डॉलर अशा दहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर होती. तेल आयात 2.5 टक्क्यांनी वाढून ती मे महिन्यात 14.46 अब्ज डॉलरवर गेली आहे.

सोने आयात 72 टक्क्यांनी घटली
विशेष गोष्ट म्हणजे सोन्याची आयात मे महिन्यामध्ये 72 टक्क्यांनी घटून ती 2.19 अब्ज डॉलरवर आली आहे. त्या अगोदरच्या वर्षात याच कालावधीत ती 7.7 अब्ज डॉलर झाली होती. सोने आयातीवरील निर्बंधांचा परिणाम हिरे आणि दागिने निर्यातीवर झाला आहे. हिरे आणि दागिने आयातीमध्ये किरकोळ 1.36 अब्ज डॉलरने वाढ होऊन ती 3.43 अब्ज डॉलरवर गेली आहे.

जीवनावश्यक वस्तूंवर करडी नजर
गहू आणि तांदळाची स्थिती सध्या काळजी करण्यासारखी नसली, तरी केंद्र सरकार प्रत्येक परिस्थितीचा बारकाईने आढावा घेत आहे. त्याचबरोबर कांदा, दूध आणि डाळीसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या स्थितीवर दररोज लक्ष ठेवण्यात येत आहे. गरज भासल्यास त्यात हस्तक्षेप करण्यात येईल, असेही खेर यांनी सांगितले.

लक्षणीय निर्यात वाढीचे क्षेत्र
अभियांत्रिकी : 22.09 %, पेट्रोलियम उत्पादने : 28.7 %, तयार कपडे : 24.94 %, औषध : 10 %, रसायन : 13.8 %