आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरोपातून मागणी घडली, निर्यातीचा वेग मे महिन्यात मंदावला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - युरोपसारख्या पाश्चिमात्य देशांतील मागणी मंदावल्यामुळे देशाच्या निर्यातीमध्ये एप्रिल महिन्यात वार्षिक आधारावर केवळ 3.2 टक्क्यांनी वाढ होऊन ती 24.4 अब्ज डॉलरवर गेली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे; परंतु सध्या रुपयाच्या घसरणीचा कल लक्षात घेता दीर्घकाळात मात्र निर्यात गरुडभरारी घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आयातीमध्ये लक्षणीय घट होऊन ती 13.2 अब्ज डॉलरची झाली आहे. गेल्या सात महिन्यातील ही सर्वात कमी निर्यात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात आयातीमध्ये 3.8 टक्क्यांनी वाढ होऊन ती 37.9 अब्ज डॉलरवर गेली होती.

आयात - निर्यात व्यापारातील तूट कमी झाल्यामुळे गेल्या वर्षाच्या सप्टेंबरपासून डॉलरच्या तुलनेत जवळपास 15 टक्क्यांनी घसरलेल्या रुपयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. रुपयाच्या अवमूल्यनाचा दीर्घकाळात फायदा होण्याची अपेक्षा निर्यातदार व्यक्त करीत आहेत; परंतु खरेदीदारांना मात्र सवलत देण्यावर जास्त जोर देत आहेत.

मागील आर्थिक वर्षात देशाची व्यापार तूट वाढून ती सर्वाधिक 185 अब्ज डॉलरवर गेली होती. 2011 - 12 आर्थिक वर्षात निर्यातीमध्ये 21 टक्क्यांनी वाढ होऊन ती 303.7 अब्ज डॉलरवर गेली होती.
निर्यात बंदीमुळे कापूस कवडीमोल शेतकरी अडचणीत