आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतांवर जास्त कर असावा : पी. चिदंबरम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - श्रीमंतांवर अधिक कर असावा, असे मत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणूक
दारांबरोबरच्या दोन दिवसांच्या बैठकांत अर्थमंत्र्यांनी स्थायी कर व्यस्थेवर भर दिला.
ते म्हणाले, माझा स्थिर कर दरांवर अधिक विश्वास आहे. सध्या सरकार तसेच अर्थव्यवस्थेला अधिक संसाधनांची आवश्यकता आहे. त्यामुळे श्रीमंतांनी स्वच्छेने थोडा जास्त कर भरणा केला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की, कराचे दर स्थायी नसावेत. मला वाटते कराचे दर स्थिर असावेत. तसेच अधिक श्रीमंतांनी थोडा जास्त कर भरायला हवा. यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. अडचणीच्या काळात तर श्रीमंतांना जास्त कर भरायला सांगितले पाहिजे.

जबाबदार बजेट
निवडणुका नजरेसमोर ठेवून बजेट बनवण्यात येणार नसल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. ते म्हणाले, निवडणुकीला अजून 14 ते 15 महिने अवधी आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प बनवताना जबाबदारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
वित्तीय तुटीची चिंता
चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तुटीचे प्रमाण 5.3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात सरकारला यश आले आणि अर्थसंकल्पातील अंदाजानुसार येत्या आर्थिक वर्षात तुटीचे प्रमाण 4.8 टक्क्यांपेक्षा कमी राहिले तर येत्या वर्षात महसुलाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.
रेटिंग एजन्सीजना इशारा
रेटिंग एजन्सीजनी आता एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली असल्याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले. आता परिस्थिती सुधारत आहे त्यामुळे रेटिंगही सुधारित यायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.
रंगराजन यांचा प्रस्ताव
अधिक श्रीमंतांवर अधिक कर असा प्रस्ताव पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे चेअरमन सी. रंगराजन यांनी यापूर्वीच मांडला आहे. तज्ज्ञांनी त्यास सहमती दर्शवली आहे. विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी ही सूचना योग्य असली ती वास्तवात आणण्याच्या सरकारच्या इच्छाशक्तीविषयी शंका व्यक्त केली होती.