आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्लो गिअरमध्ये अडकली एफ-वन रेस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एफ -वन रेसमध्ये मोठे निर्णय घेण्यास विलंब लागतो. मात्र, या विलंबामुळे या वेगवान शर्यतीला बांधून ठेवले आहे. फॉर्म्युला वनचे प्रमुख बर्नी एक्लेस्टोन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होवोत अथवा न होवोत, हे सिद्ध करणे न्यायालयाचे काम आहे. त्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. र्जमनीच्या बवेरियन प्रांतिक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

एक्लेस्टोन अनेक वर्षांपासून एफ-वनचे प्रमुख आहेत. सध्या ते चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. कारण गेरहाल्ड ग्रिबकोवस्की नावाच्या एका बँकरला एफ-वनच्या हिस्सेदारी विक्रीसंबंधात लाच घेताना पकडण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये वयाची 83 गाठणार्‍या एक्लेस्टोन यांनी मात्र आपण कोणतेही अवैध काम केले नसल्याचे म्हटले आहे. ग्रिबकोवस्की प्रकरणाच्या सुनावणीत त्यांनी पाच वर्षांपूर्वी अशी रक्कम दिल्याचे मान्य केले होते. मात्र, असे करण्यासाठी आपल्यावर मोठा दबाब होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

बर्नीच्या वकिलांकडून आणखी काही माहिती दाखल होण्याच्या प्रतीक्षेत न्यायालय आहे. यात जेवढा विलंब होईल तेवढे एफ-वन शर्यतीवरील अनिश्चिततेचे मळभ राहणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आता बरेच काही अवलंबून आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेऊन एफ-वन शर्यतीशी संबंधित लोक आता निर्णय टाळत आहेत किंवा लांबणीवर टाकत आहेत. त्यामुळे मागील काही महिने एफ-वन शर्यत थबकल्यासारखी आहे.र्जमन बँकेची एफ-वनमध्ये असणारी 47 टक्के भागीदारी विकण्याची जबाबदारी 2006 मध्ये ग्रिबकोवस्की यांच्याकडे होती. सीव्हीसी कॅपिटल हा गुंतवणूकदार समूहाला ही हिस्सेदारी विक्री करायची होती.

कागदोपत्री सध्याही कॅपिटल पार्टनर्स फॉम्र्युला वनमधील समभाग विकण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, आता समभाग विक्री बासनात गुंडाळून ठेवल्यासारखी स्थिती आहे. मात्र, हे स्वीकार करण्यास कोणीही तयार नसून खासगी व्यवहारातून हे समभाग खरेदी करू इच्छिणार्‍या कंपनीचा शोध सुरू आहे. ही वास्तविकता असली तरी फॉर्म्युला वनच्या नफ्यातील लाभ खासगी इक्विटीशी निगडित आहे.

या प्रकरणाला होत असलेल्या विलंबामुळे निराश असल्याचे एक्लेस्टोन यांचे म्हणणे आहे. हे प्रकरण लवकरात लवकर संपावे आणि कारभार पुन्हा सुरळीत सुरू व्हावा, असे त्यांना वाटते. त्यांना आता लंडनमधील र्जमन मीडिया समूहाच्या कोन्स्टानटिन मेडियनशी संबंधित एक दिवाणी प्रकरणाचा गुंताही सोडवायचा आहे. या कंपनीने सुमारे 1061 रुपयांचा (17.1 कोटी डॉलर) नुकसान भरपाईचा दावा केला आहे. फॉर्म्युला वनची हिस्सेदारी जेव्हा सीव्हीसी कॅपिटलला विक्री झाली तेव्हा त्यांचे मूल्यमापन कमी झाल्याचे कोन्स्टानटिन मेडियनचे म्हणणे आहे.

(लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.)

(kabeer.mahajan@dainikbhaskargroup.com)