आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Face Shift App For Smartphone, Photo Editing App

कोणत्याही फोटोवर लावा कोणताही चेहरा, स्मार्टफोनध्येच मिळत आहे फेस शिफ्ट अ‍ॅप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनच्या जगात अनेक फोटो इडिटिंग अ‍ॅप्स आहेत. यापैकी काही अ‍ॅप फोटोचा कलर आणि कॅंट्रास्ट बदलण्यासाठी उपयोगी येतात तर काही स्टिकर सारखे इफेक्ट देण्यासाठी कामी येतात. या सोबतच आता पूर्ण चेहराच बदलणारे अ‍ॅपही उपलब्ध आहे. या अ‍ॅपचे नाव फेस शिफ्ट आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही एका व्यक्तिच्या शरिरावर दूस-या व्यक्तीचा चेहरा लावू शकता.
फेस शिफ्टच्या मदतीने तुम्ही नकली फोटो तयार करू शकता. स्मार्टफनमध्येच तुम्ही फोटो इडिटिंगचा अनुभव घेऊ शकता. या अ‍ॅपमध्ये 16 फोटोजसोबतच एक फुल शिफ्ट गॅलरीही देण्यात आली आहे. या सोबतच यामध्ये स्टिकर्स, स्किन कलर मॅचिंग फिचर, फोटो शेअरिंग सारखे फिचर्स आहेत ज्याने तुम्ही फोटोला नवीन लूक देऊ शकता. हे अ‍ॅप गुगल प्लेवर मोफत मोफत उपलब्ध आहे. युजर रेटिंगनूसार हे अ‍ॅप रंजक आहे. या अ‍ॅपची साइज 7.3MB आहे. आतापर्यंत 10000पेक्षा जास्त लोकांनी हे अ‍ॅप इंस्टॉल केले आहे.
हे अ‍ॅप Apple आयट्यून्स स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी तुमच्याकडे ios 4.3 किंवा त्याच्या पुढची ऑपरेटिंग सिस्टिम असणे गरजेचे आहे.