आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook’s Graph Search: Time To Tweak Those Privacy Settings

फेसबुकचे सर्च इंजिन \'ग्राफ सर्च\' लाँच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेन डिएगो- फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी कंपनी मुख्यालय मेनलो पार्क येथे फेसबुकचे सर्च इंजिन ग्राफ सर्चचे मंगळवारी लॉँचिंग केले. मात्र, त्यांनी हे सर्च इंजिन गुगलसारखे असणार नाही, असे सांगितले.

या ग्राफ इंजिनमध्ये आपण ‘की वर्ड’ शोधू शकता. आपण सर्च इंजिनवर बेस्ट रेस्तरॉ इन दिल्ली असे लिहिल्यास, ग्राफ इंजिन आपल्या फेसबुकवरील मित्र, त्यांच्या मित्रांच्या नेटवर्कमार्फत याची माहिती मिळवेल. या कामासाठी एक अब्ज यूर्जसनी डाऊनलोड केलेल्या माहितीचा उपयोग केला जाईल. त्यांच्याकडील 240 अब्ज छायाचित्रे तसेच एक लाख कोटी सामग्रीची माहिती आमच्याकडून पुरविली जाईल, असे झुकेरबर्ग म्हणाले.