आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फेसबुक\'ने दोन बिलियन डॉलरमध्ये खरेदी केली \'व्हर्चुअल रिअॅलिटी\' कंपनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिंग्टन- सोशल मीडियात आघाडीवर असलेलेल्या 'फेसबुक'ने 'व्हर्चुअल रिअॅलिटी जगतातील दिग्गज कंपनी 'ओक्यूलस व्हीआर'चे अधिग्रहण करणार आहे. 'फेसबुक'ने या कंपनीसाठी सुमारे बारा हजार कोटी रुपये (दोन बि‍लियन डॉलर) एवढी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दर्शविली आहे. या मोठ्या व्यवहारामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

'हार्डवेअर' क्षेत्रात 'फेसबुक'चे हे पहिले पाऊल म्हणता येईल. या सौद्यामुळे व्हिडिओ गेम खेळणे तसेच कम्युनिकेशनच्या पद्धतीत क्रांतीकारी बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'मोबाईल हा आजच्या काळातील मोठे व्यासपीठ आहे आणि आम्ही भविष्यातील एका व्यासपीठासाठी देखील सज्ज होत आहोत. आतापर्यंतचे सर्वांत समाजशील असे व्यासपीठ निर्माण करण्याची संधी ऑक्युलसकडे आहे. आपली कामाची पद्धत, खेळाची आणि संपर्काची पद्धत त्यामुळे बदलू शकेल', असे 'फेसबुक'चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.

कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या 'ऑक्युलस व्हीर'चे प्रमुख उत्पादन व्हिडिओ गेमसाठी गॉगलसारखा दिसणारा ‘व्हर्च्युअल रिऍलिटी हेडसेट’ आहे.

दोन हजार 407 कोटी रुपये रोख आणि नऊ हजार 633 कोटी रुपये किंमतीचे 'फेसबुक'चे दोन कोटी 30 लाख समभाग देण्यात येणार आहेत. याशिवाय या करारानुसार, विशिष्ट यश प्राप्त झाल्यानंतर सोळाशे कोटी रुपयांची कमाई रोख व स्टॉक पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती देखील झुकेरबर्ग यांनी दिली.

'ओक्यूलस व्हीआर'बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा..