नवी दिल्ली - जगभरातील तरुणांना वेड लावणारे सोशल मीडिया क्षेत्रातील
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग या महिन्यात भारतात येणार आहे. इंटरनेट डॉट ओआरजीचे संमेलन 9 व 10 ऑक्टोबरला होणार असून, यामध्ये झुकेरबर्ग सहभागी होण्यासाठी येणार आहेत.त्या दरम्यान ते पंतप्रधान मोदींची देखील भेट घेणार आहेत. जगभरातील सर्वच स्थरातील लोकांनी इंटरनेटचा वापर करावा असे इंटरनेट डॉट ओआरजी संमेलनाचा मुख्य विषय आहे.
फेसबुक एरिक्सन, मेडियटेक,
नोकिया, ऑपेरा, क्वालकॉम आणि
सॅमसंगयांचे संस्थापक सदस्य देखील या संमेलनात सहभागी होणार आहेत. सोशल मीडिया क्षेत्रात भारताचा क्रमांक दुस-या स्थानी आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेला हे नुकतेच भारत दौ-यावर येवून गेले आहेत आणि आता तरुण अब्जाधिश म्हणून ओळख असलेले मार्क झुकेबर्क भारतात येणार आहेत.
मागील लोकसभेच्या वेळी सोशल मीडियाचा योग्य वापर करुन मोदी सरकार केंद्रात निवडून आले होते. त्याच अनुशंगाने पुढील काळात फेसबुक कशा प्रकारे मदत करु शकेल या विषयावर मोदी आणि झुकेरबर्ग यांच्यात चर्चा होणार आहे.