आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Free Voice Calling Feature Launched In India

FACEBOOKवरून करा FREE CALLS, भारतात लॉन्च झाले नवीन फिचर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक अ‍ॅन्ड्राइड अ‍ॅपमध्ये आता यूजर्सना फ्री व्हाइस सर्विस मिळणार आहे. भारतातील जे यूजर्स स्मार्टफोनवर फ्री फेसबुक मॅसेजिंग अ‍ॅपचा वापर करत आहेत ते आता फ्री कॉलही करू शकतात. सध्या कंपनीने हे अधिकृतरित्या जाहिर केलेले नसले तरी अ‍ॅपवर हे फिचर आले आहे. भारतात ही सर्विस उशीरा आली आहे. हे फिचर कॅनडा आणि अमेरिकेत एक वर्षापूर्वीच लॉन्च करण्यात आले होते. हा फ्री कॉल फेसबुक फ्रेण्डसना करता येईल.
WeChat, Whatsapp ला तगडी टक्कर
या फिचरची खास वैशिष्टे म्हणजे येथे कॉल पूर्णपणे मोफत नाही. यात इंटरनेट शुल्क असेल. हा कॉल वॉट्सअ‍ॅप आणि वीचाटच्या मॅसेजिंग अ‍ॅपप्रमाणेच आहे असे म्हणता येईल. आता फेसबुक मॅसेंजरने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने याचा प्रभाव वॉट्सअ‍ॅप आणि वीचाटच्या लोकप्रियतेवर पडण्याची शक्यता आहे. फेसबुक हे सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे आणि मोबाइल अ‍ॅपमध्येही आता फेसबुक नवनवीन फिचर उपलब्ध करून देत आहे. अशात सोशल नेटवर्किंग अ‍ॅपला धोका असू शकतो.
कसा करता येईल फेसबुकवरून व्हाइस कॉल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...