आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Is In Talks To Acquire Drone Making Titan Aerospace

\'व्हॉट्‍सअॅप\'नंतर \'ड्रोन\' कंपनी खरेदी करणार \'फेसबुक\', 6 कोटी डॉलर मोजणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को- जगातील सगळ्यात आघाडीची सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबुक'ने 'ड्रोन' विमाने निर्माता कंपनी 'टायटन एअरोस्पेस'ला खरेदी करण्याची तयारी केली आहे. ही कंपनी खरेदी करण्यासाठी 'फेसबुक'ने सुमारे सहा कोटी डॉलर मोजण्याची तयारीही दर्शविली आहे.

'फेसबुक'ने व्हॉट्‍सअॅप खरेदी केल्यानंतर एवढी मोठी डिल करण्‍याचा विचार केला आहे. सध्या याबाबत 'फेसबुक' आणि 'टायटन एअरोस्पेस'मध्ये चर्चा सुरु असल्याचा दावा 'टेकक्रन्च ब्लॉग'ने केला आहे.

'टेकक्रन्च ब्लॉग'नुसार, ड्रोन प्लेनच्या माध्यमातून जगातील अविकसित भागातही फेसबुक युजर्सला वायरलेस इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 'टायटन एअरोस्पेस' आणि 'फेसबुक'मध्ये सुरु असलेल्या चर्चेचे वृत्त सगळ्यात आधी 'टेकक्रन्च'नेच प्रसिद्ध केले होते.

आफ्रिका आणि आशिया खंडामधील अनेक देशांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. ड्रोनच्या माध्यमातून या देशांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून तेथील जनतेला मोठ्या प्रमाणात 'फेसबुक'शी कनेक्ट केले जाणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 'फेसबुक' आणि 'टायटन'चा प्रतिक्रिया देण्यास नकार..