आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Phone Expected On April 4, Photos Leak Be Four Launching

OMG:\'फेसबुक फोन\' लॉंच होण्यापूर्वीच झाला लीक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक अँड्राइड इव्हेट चार एप्रिलला लॉन्च होण्याची शक्यता आहे. परंतु हा फोन लॉन्च होण्याआधीच इंटरनेटवर त्याचे फोटोज् लीक झाले आहेत. या फोनच्या लॉचिंगसोबत 'फेसबुक' सोशल-नेटवर्किंग साइटच्या जगाबाहेर जाऊन गॅझेटच्या दुनियेत आपली पकड मजबूत करत आहे. यासोबत अँड्राइडचे अ‍ॅडव्हान्स व्हर्जनही लॉन्च करण्‍याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फेसबुकने एचटीसीसोबत करार करून या फोनची निर्मिती केली आहे. 'एचटीसी फर्स्ट' असे या फोनचे नाव आहे. 'एचटीसी फर्स्ट' हा मिड-रेंज फोन असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. फोनची स्क्रीन 4.3 इंचाची असून रॅम एक जीबी असण्याची शक्यता आहे. यात 16 जीबीची इंटरनल मेमरी असेल तसेच 5 मेगा-पिक्सलचा कॅमेरा असेल.

फेसबुक फोनची लीक झालेले फोटोज् पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...