आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Phone Expected On April 4, Photos Leak Be Four Launching

फेसबुक स्मार्टफोन आज लाँच होणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुक 4 एप्रिल रोजी पत्रकारांना आपले मुख्यालय मेनलो पार्कमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. यामुळे फेसबुक आपला पहिलावाहिला स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. फेसबुकसाठी एचटीसी कॉर्प कंपनीने नवा स्मार्टफोन तयार केला आहे. त्याचे फोटोही इंटरनेटवर लीक झाले आहेत. या स्मार्टफोनचे नाव ‘ऑपेरा यूएल’ असल्याचे समजते. काही वेबसाइटनी ‘मिस्ट’ व ‘एचटीसी फर्स्ट’ असल्याचे म्हटले आहे.

वैशिष्ट्ये :
स्क्रीन : 4.3 इंच
प्रोसेसर : ड्युअल कोअर क्वॉलकॉम स्नॅप ड्रॅगन
रॅम : 1 जीबी
स्टोअरेज : 16 जीबी
कॅमेरा : 5 मेगापिक्सेल