आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsAppला Facebookने विकत घेतले , 1182 अब्ज रूपयांत झाली डील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरूणांमध्ये अल्पवधीतच लोकप्रियता मिळवणारे व्हॉट्स अ‍ॅप हे मोबाइल मॅसेजिंग स्टार्ट अप्लिकेशन आता फेसबुक विकत घेतले आहे. फेसबुकने व्हॉट्स अ‍ॅपला 1182 अब्ज रूपयात खरेदी केले आहे.

जगभरात सोशल नेटवर्क वाढवण्यासाठी फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. व्हॉट्स अ‍ॅपचे जगभरात 450 दशलक्ष युजर्स आहेत.

मोबाइल अ‍ॅपची वाढती बाजारपेठ डोळ्यासमोर ठेऊन फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. मॅसेजिंग सोबतच सोशल नेटवर्किंगवर फोटो आणि यू ट्यूबवर व्हिडिओ शेअरची सुविधा देणारे व्हॉट्स अ‍ॅप जगभरात एक महत्त्वाचे अॅप ठरले आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये व्हॉट्स अ‍ॅप उशिरा उतरले असले तरी स्मार्टफोनवर उपलब्ध असल्याने अल्पावधीतच हे अ‍ॅप इतर अ‍ॅपच्या तुलनेत जास्त लोकप्रिय ठरले आहे.

व्हॉट्स अ‍ॅपवर रोज जवळपास एक लाख लोक कनेक्ट होतात. यामुळेच व्हॉट्स अ‍ॅपला खरेदी करून फेसबुक आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. फेसबुकच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, 1182 अब्ज रूपयात ही डिल होणार आहे. यापैकी 248 अब्ज रूपये रोख दिले जातील तर उर्वरित रक्कम स्टॉकच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

व्हॉट्सविषयीची खास माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडसवर क्लिक करा...