फेसबुकने आणली नवीन / फेसबुकने आणली नवीन ADD सर्विस, व्हिडीओ पाहिल्याने होईल कमाई

Mar 14,2014 05:55:00 PM IST
फेसबुकने गुरूवारी व्हिडीओ जाहिरात सर्विस सुरू केली आहे. ही व्हिडीओ जाहिरात यूजर्सच्या न्यूज फिडमध्ये दिसणार आहे. फेसबुकचे प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजर सुसैन बकनरच्या मते, गेल्या वर्षीच्या शेवटी या सर्विसची चाचणी घेण्यात आली आणि 1.2 बिलियन यूजर्सच्या प्रोफाइलमध्ये ही सर्विस जोडली गेली होती.
फेसबुकच्या प्रोडक्ट मार्केटिंगचे मॅनेजरच्या मते, कंपनी यूजर्सना जोडण्यासाठी ही व्हिडीओ एक्सपिरियंस सुरू करणार आहे. सुसैनने सांगितले, की फेसबुक लवकरच प्रीमियम व्हिडीओ सर्विस जाहिरात सुरू करणार आहे. किती लोकांना ही जाहिरात आवडते ते ही फेसबुक पाहणार आहे.
फेसबुकनूसार, 15 सेकंदाची ही जाहिरात न्यूज फीडमध्ये ऑटोमॅटिकली सुरू होईल. फेसबुकने या जाहिरातीसाठीचे दर ठरवलेले नाहीत, परंतू ऑनलाइन रिपोटर्सचे संकेत दिले आहेत. न्यूजफिडमध्ये जाहिरात देण्यासाठी जाहिरातदाराला 2.5 मिलियन डॉलर खर्च करावे लागतील.
प्रिमीयम व्हिडीओ जाहिरातीचे दर टिव्ही जाहिरातीप्रमाणे असतील असे, बकनर ने ऑनलाइन पोस्टमध्ये सांगितले आहे.
येणा-या काही महिन्यातच यूजर्सच्या मोबाइल आणि डेस्कटॉप न्यूजफिडमध्ये ही व्हिडीओ जाहिरात दिसेल.
X