मुंबई - विदेशातील मागणी वाढल्यामुळे देशातील उत्पादन क्षेत्राला पुन्हा बळकटी मिळू लागली आहे. उत्पादन क्षेत्राने यंदाच्या जून महिन्यात चांगली वाढ नोंदवली असून फेब्रुवारीपासूनची ही जलद वाढ असल्याचे ‘एचएसबीसी’ने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
उत्पादनवाढीच्या कामगिरीचे मूल्यमापन करणार्या एचएसबीसी इंडियाच्या उत्पादन खरेदी निर्देशांकात वाढ होऊन तो मे महिन्यातील 51.4 वरून जूनमध्ये 51.5 वर गेला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये उत्पादन क्षेत्रातील कामकाजात सलग सुधारणा झाल्याचा हा परिणाम आहे.
देशातील उत्पादन क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत असून जूनमध्ये उत्पादनाचा वेग वाढला आहे. विशेष करून विदेशातील मागणी वाढल्यामुळे सकारात्मक परिणाम झाला आहे. उत्पादनाच्या पातळीतही वाढ झाली असल्याचे एचएसबीच्या आशियाई आर्थिक संशोेधन विभागाचे सहप्रमुख फ्रेडरिक न्यूमन यांनी सांगितले.