स्पाइसजेट आणि इंडिगो विमान कंपन्यांनी ग्राहकांसाठी विमान प्रवासाचे तिकीट दर कमी केले आहेत. ग्राहकांना अाकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांनी विविध ऑफरच्या माध्यमातून तिकीट दरांमध्ये सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाभरात विमान प्रवासाचे दर कमी करण्याची ही चौथी वेळ आहे. इंडिगो या विमान कंपनीने 15 ते 25 टक्के तिकीट दरात सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या काळात तिकट दरात सुट देण्यात येणार आहे.
स्पाईस विमान कंपनी 12 ते 16 मार्च या काळात तिकीट बुक करणा-या ग्राहकाला ही सुट देणार आहे. 14 एप्रिल ते 30 जून या काळामध्ये प्रवास करता येईल, असे स्पाईस विमान कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ही ऑफर तिकीटाची किंमत 1999 रूपयांपासून सुरू होणार आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तिही विमान प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करा, आणि जाणून घ्या ऑफर विषयी...