आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Falling Gold, Oil Prices To Help RBI Cut Rates Aggressively: Experts

सोने, तेलातील घसरण व्याजदर कपातीच्या पथ्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोने आणि तेलाच्या किमतीतील घसरण व्याजदर कपातीसाठी साहाय्यभूत ठरेल, असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी गुरुवारी वर्तवला. या कमोडिटीच्या घसरत्या किमतीमुळे चालू खात्यातील आर्थिक तूट कमी होण्यास मदत होणार आहे. व्याजदर कपातीसाठी आरबीआयला त्यामुळे मदत होईल, असे जाणकारंचे मत आहे.

येत्या 3 मे रोजी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) वार्षिक पतधोरण जाहीर करणार आहे.आरबीएसच्या अहवालानुसार या घसरणीचा भारताच्या चालू खात्यातील आर्थिक तुटीवर चांगला परिणाम झाला आहे. ही तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) 1.9 टक्क्यांपर्यंत आहे. चालू आर्थिक वर्षात सोने व तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर राहतील, सोन्याची मागणी स्थिर होईल असे या अहवालात नमूद आहे. चालू खात्यातील आर्थिक तूट कमी झाल्यामुले आरबीआयला व्याजदर कपात करणे सुलभ होईल असे अहवालात म्हटले आहे.

बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालानुसार सोन्यासारख्या कमोडिटीतील घसरण दोन्ही खात्यातील वित्तीय तूट कमी करण्यास सहायक असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे. या घसरणीमुळे आरबीआयला व्याजदर कपातीची पावले उचलणे सोपे जाईल. आरबीआयकडून प्रमुख व्याजदरात 100 मूळ अंकांची कपात अपेक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे. याआधी मेरिल लिंचने 75 मूळ अंकांच्या कपातीचा अंदाज व्यक्त केला होता.