आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात आर्थिक आणीबाणी; रुपया 68 वर, परिस्थिती सावरण्यासाठी सोने ठेवणार गहाण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. भारतीय रुपयाने सध्या जगातील सर्व चलनांमध्ये नीचांकी पातळी गाठली आहे. निवडणूकीतील फायदा डोळ्यासमोर ठेवून मंजूर करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा विधेयकामुळे सरकारी तिजोरीवर फार मोठा बोजा पडणार आहे, त्यामुळे देशाचे रेटिंगही घसरण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यतांचा परिणाम बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 68 अंकावर गेला.

शेअर बाजारातही मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेंसेक्समध्ये जवळपास 500 अंकाची घसरणा झाली आहे. सेंसेक्स 17500 पेक्षा खाली गेला आहे. निफ्टीमध्ये देखील 150 अंकाची घट नोंदवली गेली आहे. तर, सोन्याला तेजीची झळाळी आली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 34 हजारांवर गेली आहे.

दरम्यान, पुढील महिन्यात डिझेलमध्ये प्रती लिटर 4 रुपये आणि अनुदानित स्वंयपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्री पी. चिदंबरम या सर्व परिस्थितीमध्ये संयमाचा सल्ला देत आहेत. तर, केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी ही परिस्थिती वाईट असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आपल्याकडे 31 हजार टन सोने आहे. जर, आपण 500 टन सोने जरी गहाण ठेवले तरी, या परिस्थितीतून सावरू शकतो. त्यासोबतच त्यांनी हा माझ्या वैयक्तिक विचार असल्याची पुस्ती जोडली. तसेच सोने गहाण ठेवण्याचा निर्णय मी घेऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोने गहान ठेवण्याची परिस्थिती आली नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, की सरकारकडे अजून सहा महिने पुरेल एवढे परकीय चलन आहे. मात्र, शर्मा यांच्या वक्तव्याने वेगळेच संकेत दिले आहेत. त्यावरून आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ आंदाज लावत आहेत, की देश 1991 सारख्या आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे. तेव्हा तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी सोने गहाण ठेवले होते.

पुढील स्लाईडमध्ये, रूपया घसरणीने काय काय होईल महाग