वॉशिंग्टन - कार कंपनी
आपल्या कारच्या मायलेजबाबत जो दावा करते तो बरोबरच असावा याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र, ही चूक दक्षिण अफ्रिकेच्या ह्युंदाई मोटर्स आणि तिची सहयोगी कंपनी किया मोटर्स यांनी केली. त्यामुळे कंपनीला १० कोटी डॉलरचा (सुमारे ६१ कोटी रुपये) दंड भरावा लागणार असून कंपनीने त्यास सहमती दर्शवली आहे.
हे प्रकरण आहे २०११ ते २०१३ चे आहे. ह्युंदाईने या काळात नऊ लाख आणि कियाने तीन लाख गाड्यांची विक्री केली. त्या वेळी म्हणजे २००८ ते २०१० या काळात मंदी होती, किफायती व स्वस्त कारकडे ग्राहकांचा ओढा होता. त्यामुळे कंपनी जास्त मायलेजचे दावे करत होती. दोन्ही कंपन्यांना त्याचा फायदाही झाला. अमेरिकेचे प्रशासन आणि ह्युंदाई -किया याच्यात करार झाला आहे. त्यानुसार आगामी काळात अशा प्रकारच्या नियमांच्या उल्लंघन नियंत्रणासाठी पाच कोटी डॉलर (३०.५ कोटी रुपये) खर्च करणार आहे.