आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफडीआयचे 12 प्रस्ताव मंजूर; 2,609 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- क्लॅरिस ओत्सुका या औषध क्षेत्रातील कंपनीसह केंद्र सरकारने 2,609 कोटी रुपयांच्या 12 विदेशी थेट गुंतवणुकीच्या प्रस्तावांना केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

आर्थिक व्यवहार सचिव अरविंद मायाराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीमध्ये डिकॅथलॉन स्पोर्ट्स इंडियाच्या सिंगल ब्रॅँड रिटेलमध्ये 700 कोटी रुपयांचे विदेशी भांडवल आणण्याच्या प्रस्तावालादेखील मान्यता देण्यात आली आहे.

विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या 13 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत केलेल्या शिफारशींच्या आधारावर एकूण 2,609.27 कोटी रुपयांच्या 12 विदेशी थेट गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. या विविध गुंतवणूक प्रस्तावांमध्ये अहमदाबाद येथील क्लॅरिस ओत्सुका लि.चा 1 हजार 50 कोटी रुपयांचा सर्वात मोठा विदेशी गुंतवणूक प्रस्ताव आहे. आपला इनफ्युशन व्यवसाय एका नवीन संयुक्त सहकार्य कंपनीत स्वतंत्र करण्याची कंपनीची योजना आहे. त्याबरोबरच मुंबईतल्या ग्लिनवेड पाइप सिस्टिम्सच्या 800 कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणूक प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

सिंगल ब्रँडला हिरवा कंदील- सिंगल ब्रॅँड रिटेलमध्ये व्यवसाय करण्याच्या प्रमोद एस.ए.एस. या फ्रान्समधील कंपनीच्या भारतीय संयुक्त सहकार्यातील कंपनीत 29.69 कोटी रुपयांची विदेशी भांडवली गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव मंजुर झाला आहे. अन्य प्रस्तावांमध्ये फॉसिल इंडिया आणि ले क्रेयुसेट ट्रेडिंग या विदेशी कंपनीची पूर्णत: मालकी असलेली उपकंपनी या नात्याने सिंगल ब्रॅँड रिटेल दुकाने सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मार्ग मोकळा झाला आहे. मेनारिनी रॉनक फार्मा, अल शुकर कंपनी फॉर इंजिनिअरिंग अँँड कन्स्ट्रक्शन, नेदरलॅँडमधील एऑन होल्डिंग्ज या कंपन्यांचादेखील गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.