मुंबई- केंद्र सरकारकडून सातत्याने सुधारणा कार्यक्रमांवर भर दिला जात असल्याने विदेशी गुंतवणूकदारांना नवे बळ मिळाले आहे. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासून गुंतवणूकदारांनी जवळपास 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक भांडवल बाजारात केली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांनी समभाग बाजारपेठेत 19 जुलैपर्यंत एकूण 10,755 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. कर्ज बाजारपेठेतील 11,268 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह त्यांनी एकूण 22,023 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे बाजारात उपलब्ध असलेली आकडेवारी सांगते.
गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2014-15 वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अनेक उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत.