आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एफडीआय’चा झरा पुन्हा आटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय)आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असतानाही मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत देशात येणा-या थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ आटला आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत विदेशी थेट गुंतवणूक सहा टक्क्यांनी घसरली असून ती अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 5.84 अब्ज डॉलरवरून 5.47 अब्ज डॉलरवर आली आहे.


विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेताना मल्टिब्रँड रिटेल, नागरी हवाई वाहतूक, प्रसारण यांसारख्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांमधील विदेशी थेट गुंतवणुकीच्या धोरणांमध्ये उदारता आणली. विमा आणि पेन्शन क्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ करण्याचेदेखील प्रयत्न सुरू आहेत, परंतु विदेशी थेट गुंतवणुकीला चालना देण्यासाठी व्यावसायिक वातावरणात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


मॉरिशस, त्यापाठोपाठ ब्रिटन, सिंगापूर, जपान आणि अमेरिका या प्रमुख देशांमधून मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणुकीचा ओघ आला आहे.


एफडीआयचा कल
जानेवारी 2.15 अब्ज डॉलर
फेब्रुवारी 1.79 अब्ज डॉलर
मार्च 1.52 अब्ज डॉलर


या क्षेत्रात आला सर्वाधिक ‘एफडीआय’
सेवा, हॉटेल आणि पर्यटन, हवामान, बांधकाम, वाहन आणि औषध.