आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एफडीआय’च्या प्रवाहात सरकारी धोरणाचा खोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असतानाही मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत देशात येणार्‍या थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफआयआय) ओघ आटला आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत विदेशी थेट गुंतवणूक सहा टक्क्यांनी घसरली असून ती अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 5.84 अब्ज डॉलरवरून 5.47 अब्ज डॉलरवर आली आहे. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेताना मल्टी ब्रॅँड रिटेल, नागरी हवाई वाहतूक, प्रसारण यासारख्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांमधील विदेशी थेट गुंतवणुकीच्या धोरणांमध्ये उदारता आणली.
विमा आणि पेन्शन क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ करण्याचेदेखील प्रयत्न सुरू आहेत. परंतु विदेशी थेट गुंतवणुकीला चालना देण्यासाठी व्यावसायिक वातावरणात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.