आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- चालू आर्थिक वर्षातल्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एफडीआयचा ओघ जवळपास 31 टक्क्यांनी घटला असून तो अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 22.83 अब्ज डॉलर्सवरून 15.84 अब्ज डॉलर्सवर आल्याचे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्याच्या वरिष्ठ अधिका-या ने सांगितले. या अगोदर जानेवारी 2011 मध्ये विदेशी थेट गुंतवणुकीने 1.04 अब्ज डॉलर्सचा नीचांक गाठला होता.
एडीआयशी निगडित मुद्द्यांबाबत राजकीय मतैक्याचा अभाव आणि जागतिक आर्थिक मंदी या दोन मुख्य गोष्टींमुळे एफडीआय घसरली असल्याचे मत अमरचंद अॅँड मंगलदास या कॉर्पोरेट कर क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीचे एफडीआयचे तज्ज्ञ कृष्णन मल्होत्रा यांनी व्यक्त केले.
चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या आठ महिन्यातील विविध क्षेत्रातला एफडीआयचा ओघ : सेवा : 3.63 अब्ज डॉलर्स; हॉटेल आणि पर्यटन : 3.13 अब्ज डॉलर्स; हवामान : 1.26 अब्ज डॉलर्स, बांधकाम : 1.01 अब्ज डॉलर्स, वाहन : 760 दशलक्ष डॉलर्स. गेल्या दोन मॉरिशस : 7.2 अब्ज डॉलर्स, सिंगापूर - 1.5 अब्ज डॉलर्स, नेदरलॅँड्स - 1.09 अब्ज, ब्रिटन - 6.15 अब्ज डॉलर्स अशी थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.