आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Features And Specifications Of Newly Launched Nokia Lumia 1020

भारतात लॉंच झालेला नोकिया ल्‍युमिया 1020 आहे एकदम खास....

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकियाने ऍपल, सॅमसंग आणि सोनीच्‍या जबरदस्‍त स्‍मार्टफोन्‍सला टक्‍कर देण्‍यासाठी लॉंच केलेला ल्‍युमिया 1020 स्‍मार्टफोन अखेर भारतात लॉंच केला आहे. हा फोन जुलैमध्‍येच न्‍यूयॉर्कमध्‍ये सादर करण्‍यात आला होता. या फोनबद्दल गॅजेटप्रेमींमध्‍ये प्रचंड उत्‍साह होता. लॉंच करण्‍यापूर्वीच फोनची छायाचित्रे आणि स्‍पेसिफिकेशन्‍स लीक झाले होते. या फोनमध्‍ये 41 मेगापिक्‍सेलचा कॅमेरा आहे. एवढा पावरफुल कॅमेरा कोणत्‍याच स्‍मार्टफोनमध्‍ये नाही. नुकताच सोनीने होनामी झेड1 स्‍मार्टफोन लॉंच केला होता. त्‍यात वेगळी लेंस लावण्‍याची सुविधा आहे. हा फोनदेखील या कॅमेरला टक्‍कर देऊ शकत नाही.

नोकियाचा हा फोन प्रचंड लोकप्रिय झाला आहे. आता हा भारतात दाखल झाला आहे. या फोनची भारतात किंमत काय असेल, याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. परंतु, हा फोन 50 हजार रुपयांच्‍या जवळपास उपलब्‍ध होण्‍याची शक्‍यता आहे. भारतात फोनला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा कंपनीचा अंदाज आहे.

काय खास आहे या फोनमध्‍ये.. वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..