REVIEW: पॅनासॉनिकच्या P31 / REVIEW: पॅनासॉनिकच्या P31 या नवीन स्मार्टफोनची किंमत 11,990 जाणून घ्या फिचर्स

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 14,2014 03:09:00 PM IST

पॅनासॉनिकने या आठवड्यात क्वाड-कोर प्रोसेसर असणारा स्मार्टफोन Panasonic P31 लॉन्च केला आहे. P31 हा मायक्रोमॅक्सच्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन कॅनव्हास नाइटला टक्कर देईल. विशेष बाब म्हणजे P31 मायक्रोमॅक्सपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळत आहे. लोकप्रिय नोकिया अ‍ॅन्ड्राइड X स्मार्टफोनसाठीही हा स्मार्टफोन प्रतिस्पर्धी ठरी शकतो. P31मध्ये क्वाड- कोर प्रोसेसरसोबतच 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

हार्डवेअरच्या बाबतीतही P31 जबरदस्त ठरू शकतो. कमी किमतीत या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन चांगले आहेत. divyamarathi.com आज तुम्हाला हा स्मार्टफोन फिचर्सच्या तुलनेत कसा हे सांगणार आहे.पुढील स्लाइडवर वाचा पॅनासॉनिक P31चा रिव्हू
प्रोसेसर- P31चे मुख्य वैशिष्ट म्हणजे याचे 1.3 GHzचे क्वाड- कोर प्रोसेसर. पॅनासॉनिकच्याच P51 या स्मार्टफोनमध्ये 1.2 GHzचे प्रोसोसर आहे. बॅटरी - P31 मध्ये 2000 mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन 2G सर्विसवर 13 तासांचा तर 3G सर्विसवर 9 तासांचा टॉकटाइम देईल असा कंपनीने दावा केला आहे. हा स्मार्टफोन 2G वर 650 तासांचा सँडबायटाइम तर 3Gवर 600 तासांचा सँडबायटाइम देतो. कमी किमतीत हे फिचर्स चांगले म्हणता येतील. परंतू बॅटरी तुमची सर्वात मोठी गरज असेल तर यापेक्षा Gionee M2 चांगला आहे. ज्याची बॅटरी 4200 mAh आहे.कॅमेरा P31मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 10,780 रूपयांत हा कॅमेरा चांगला म्हणता येईल. 2013पासून 13 मेगापिक्सल कॅमेरा असणारे स्मार्टफोन लॉन्च होत होते तर 2014 मध्ये 16 मेगापिक्सल असणारे कॅमेरे लॉन्च व्हायला सुरवात झाली आहे. P31 या पेक्षा कमी पॉवरचा कॅमेरा असला तरी कमी किमतीच्या तुलनेने त्याला चांगला म्हणता येईल. फ्रंट कॅमे-याची पॉवर कमी असून तो केवळ व्हिडीओ चॅटसाठी उपयोगी आहे. मेमरी- P31ची 4 GB इंटरनल मेमरी, मेमरी कार्डच्या साहाय्याने 32 GB पर्यंत वाढवता येईल. हा एक साधारण स्मार्टफोन आहे. हे मेमरी फिचर लो बजेट मधील सर्वच स्मार्टफोनमध्ये मिळते.डिस्पले आणि फिचर्स- P 31 मध्ये 5 इंच स्क्रीनसोबत FWVGA रिझल्यूशन आहे. याचबरोबर 195 पिक्सल प्रती इंच एवढी डेन्सिटी आहे. हा स्मार्टफोन मोटो जी किंवा कॅनवास नाइटसारखे शार्प रिझल्यूशन देत नाही. याची डिस्प्ले स्क्रीन कदाचित तुम्हाला नाराज करू शकते. या स्मार्टफोनमधील विशिष्ट म्हणजे याची अल्ट्रा ओलियोफोबिक कोटिंग (Ultra Oleophobic coating). हे फिचर P31 ला फिंगर प्रिंट रिसिस्टेंस बनवते. स्क्रीनचे हेच फिचर P31ला थोडे वेगळे बनवते. ऑपरेटिंग सिस्टम- अॅन्ड्राइड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम आता जूनी झाली आहे. याच किंमतीत अॅन्ड्राइड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टम असणारा मोटो G स्मार्टफोन मिळत आहे. अॅन्ड्राइड जेलीबीनसोबतच पॅनासॉनिकमध्ये प्ले लाइफ यूजर्स इंटरफेसचा वापर करण्यात आला आहे. हे यूजर्स इंटरफेस गेस्चर आणि मोशनला सहज ओळखते. या इंटरफेसमध्ये Gesture Play फिचर आहे. याच्या मदतीने एकाचवेळी अनेक काम करता येतात. व्हिडिओ पाहताना तुम्ही Pop-i Player आणि Music cafe सारखे फिचर्स वापरू शकता. यामध्ये बॅटरी सेव्हिंग पॉवर मोडही आहे.P31 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन पाहता मोटो G, कॅनवास नाइट, कॅनवास मिनी टर्बो, जिओनी M2 आणि कार्बन टाइटेनिअम S5 प्लस या स्मार्टफोन्सना टक्कर देऊ शकतो. फीचर्स- * 5 इंच स्क्रीन * 1.3 GHz क्वाड-कोर प्रोसेसर * 1 GB रॅम * 4 GB इंटरनल मेमरी * अॅन्ड्रॉइड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम * 8 मेगापिक्सल कॅमेरा * 2000 mAh बॅटरी * किंमत- 11,990 रुपये पॅनासॉनिक P31 कमी किमतीत मिळत आहे आणि याचे हार्डवेअर चांगले असले तरी या स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर काही विशेष नाही. या स्मार्टफोनमध्ये चांगले प्रोसेसर लावले असले तरी हा स्मार्टफोन मोटो G सारख्या स्मार्टफोनला टक्कर देऊ शकणार नाही.

प्रोसेसर- P31चे मुख्य वैशिष्ट म्हणजे याचे 1.3 GHzचे क्वाड- कोर प्रोसेसर. पॅनासॉनिकच्याच P51 या स्मार्टफोनमध्ये 1.2 GHzचे प्रोसोसर आहे. बॅटरी - P31 मध्ये 2000 mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन 2G सर्विसवर 13 तासांचा तर 3G सर्विसवर 9 तासांचा टॉकटाइम देईल असा कंपनीने दावा केला आहे. हा स्मार्टफोन 2G वर 650 तासांचा सँडबायटाइम तर 3Gवर 600 तासांचा सँडबायटाइम देतो. कमी किमतीत हे फिचर्स चांगले म्हणता येतील. परंतू बॅटरी तुमची सर्वात मोठी गरज असेल तर यापेक्षा Gionee M2 चांगला आहे. ज्याची बॅटरी 4200 mAh आहे.

कॅमेरा P31मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 10,780 रूपयांत हा कॅमेरा चांगला म्हणता येईल. 2013पासून 13 मेगापिक्सल कॅमेरा असणारे स्मार्टफोन लॉन्च होत होते तर 2014 मध्ये 16 मेगापिक्सल असणारे कॅमेरे लॉन्च व्हायला सुरवात झाली आहे. P31 या पेक्षा कमी पॉवरचा कॅमेरा असला तरी कमी किमतीच्या तुलनेने त्याला चांगला म्हणता येईल. फ्रंट कॅमे-याची पॉवर कमी असून तो केवळ व्हिडीओ चॅटसाठी उपयोगी आहे. मेमरी- P31ची 4 GB इंटरनल मेमरी, मेमरी कार्डच्या साहाय्याने 32 GB पर्यंत वाढवता येईल. हा एक साधारण स्मार्टफोन आहे. हे मेमरी फिचर लो बजेट मधील सर्वच स्मार्टफोनमध्ये मिळते.

डिस्पले आणि फिचर्स- P 31 मध्ये 5 इंच स्क्रीनसोबत FWVGA रिझल्यूशन आहे. याचबरोबर 195 पिक्सल प्रती इंच एवढी डेन्सिटी आहे. हा स्मार्टफोन मोटो जी किंवा कॅनवास नाइटसारखे शार्प रिझल्यूशन देत नाही. याची डिस्प्ले स्क्रीन कदाचित तुम्हाला नाराज करू शकते. या स्मार्टफोनमधील विशिष्ट म्हणजे याची अल्ट्रा ओलियोफोबिक कोटिंग (Ultra Oleophobic coating). हे फिचर P31 ला फिंगर प्रिंट रिसिस्टेंस बनवते. स्क्रीनचे हेच फिचर P31ला थोडे वेगळे बनवते. ऑपरेटिंग सिस्टम- अॅन्ड्राइड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम आता जूनी झाली आहे. याच किंमतीत अॅन्ड्राइड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टम असणारा मोटो G स्मार्टफोन मिळत आहे. अॅन्ड्राइड जेलीबीनसोबतच पॅनासॉनिकमध्ये प्ले लाइफ यूजर्स इंटरफेसचा वापर करण्यात आला आहे. हे यूजर्स इंटरफेस गेस्चर आणि मोशनला सहज ओळखते. या इंटरफेसमध्ये Gesture Play फिचर आहे. याच्या मदतीने एकाचवेळी अनेक काम करता येतात. व्हिडिओ पाहताना तुम्ही Pop-i Player आणि Music cafe सारखे फिचर्स वापरू शकता. यामध्ये बॅटरी सेव्हिंग पॉवर मोडही आहे.

P31 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन पाहता मोटो G, कॅनवास नाइट, कॅनवास मिनी टर्बो, जिओनी M2 आणि कार्बन टाइटेनिअम S5 प्लस या स्मार्टफोन्सना टक्कर देऊ शकतो. फीचर्स- * 5 इंच स्क्रीन * 1.3 GHz क्वाड-कोर प्रोसेसर * 1 GB रॅम * 4 GB इंटरनल मेमरी * अॅन्ड्रॉइड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम * 8 मेगापिक्सल कॅमेरा * 2000 mAh बॅटरी * किंमत- 11,990 रुपये पॅनासॉनिक P31 कमी किमतीत मिळत आहे आणि याचे हार्डवेअर चांगले असले तरी या स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर काही विशेष नाही. या स्मार्टफोनमध्ये चांगले प्रोसेसर लावले असले तरी हा स्मार्टफोन मोटो G सारख्या स्मार्टफोनला टक्कर देऊ शकणार नाही.
X
COMMENT