आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fed Move Surges Sensex 600 Points, Rupee Below 62

शेअर बाजारात उत्‍साह, रूपयानेही घेतली 158 पैशांची उसळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमेरिकेच्‍या फेडरल रिझर्व्‍ह बँकेने आपल्‍या पॉलिसीत कोणतेही बदल केले नसल्‍याचा भारतीय शेअर बाजारात सकारात्‍मक परिणाम दिसून आला. दिवसाच्‍या सुरूवातीलाच सेन्‍सेक्‍समध्‍ये 556 आणि निफ्टीमध्‍ये 179 अंकाची उसळी दिसून आली. आर्थिक विकासाचे ठोस पुरावे मिळेपर्यंत खरेदीदारांवर सक्‍ती करता येणार नसल्‍याचे फेडने म्‍हटले आहे.

फेडच्‍या या निर्णयानंतर सेन्‍सेक्‍स 20 हजारांच्‍या पुढे गेला. सेन्‍सेक्‍स 20.536.29 तर निफ्टी 6083.10 वर सध्‍या आहे. त्‍याचबरोबर गेल्‍या काही दिवसापासून ढेपाळलेला भारतीय रूपयाही चांगलाच वधारला. गेल्‍या आठवडयाभरातील उच्‍चांक मोडत रूपया 158 पैशांनी वधारला. या महिन्‍याच्‍या सर्वात वरच्‍या स्‍तरावर भारतीय रूपया गेला असून तो 61.80 प्रति डॉलरवर पोहोचला आहे.

आर्थिक मंदीनंतर देशात उद्योगांना दिली जाणारी सवलत आता बंद केली जाणार नाही. अमेरिकेतील आर्थिक स्थितीत सुधारणेनंतर दर महिन्‍याला दिली जाणारी 85 अब्‍ज डॉलरची सवलत परत घेतली जाईल, असे संकेत बँकेने यापूर्वी दिले होते. बँकेच्‍या या पावित्र्यामुळे भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवर दुष्‍परिणाम झाल्‍याचे दिसून आले होते.