आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Festivel Shopping Inflation Hiked, State Bank Increases Interest Rate

सणाच्या खरेदीला महागाईची चाके, स्टेट बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाच्या मूल्यात काहीशी सुधारणा होऊ लागली आहे; परंतु या अगोदर जवळपास महिनाभर रुपयाच्या अवमूल्यनामुळे घातलेल्या गोंधळाचा वाहन कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. रुपयाची घसरण आणि वाढत्या उत्पादन खर्चाचा भार सहन न झाल्याने आता ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने बाजारात अलीकडेच आलेली ‘ग्रँड आय 10’ ही छोटेखानी मोटार वगळता अन्य सर्व मोटारींच्या किमतीमध्ये एक ऑक्टोबरपासून 20 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


‘ह्युंदाई ग्रँड’साठी अगोदरच ‘इंट्रोडक्टरी’ किंमत देण्यात आली असल्याने ही मोटार वगळता अन्य सर्व मोटारींच्या किमतींमध्ये 4 ते 20 हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले. रुपयाचे अवमूल्यन आणि त्यातच चलनवाढीचा भार यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आतापर्यंत हा बहुतांश भार सहन केला; परंतु किंमतवाढीच्या माध्यमातून तो ग्राहकांच्या खांद्यावर टाकण्यावाचून पर्याय नाही, असेही ते म्हणाले.


दोन दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनेदेखील आपल्या प्रमुख मोटारींच्या किमतीत 24 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी 21 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या साहित्यात झालेली लक्षणीय वाढ यामुळे कंपनीला किंमत वाढवणे भाग पडत आहे.


अन्य कंपन्यांची किंमतवाढ
टोयोटा 24 हजार रु. (21 सप्टेंबरपासून)
फोर्ड इंडिया 1 ते 5 टक्के (ऑगस्टपासून)
मर्सिडीज बेंझ 4 ते 5 टक्के (1 सप्टेंबरपासून)
जनरल मोटर्स 10000 रुपयांपर्यंत (सप्टेंबरपासून)
बीएमडब्ल्यू 5 टक्के (जुलैपासून)
ऑडी 4 टक्के (जुलैपासून)

पुढील स्लाइडमध्‍ये वाचा स्टेट बँकेने वाढवलेले कर्जाचे व्याजदर ....