आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारहिस्सा वाढीसाठी फियाट आक्रमक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोटार निर्मिती क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या फियाट या कंपनीने भारतीय वाहन बाजारपेठेतील आपल्या बाजारहिश्श्यात दुपटीने वाढ करून तो एक टक्क्यावर नेण्याचा निर्धार केला आहे. इतकेच नाही, तर आपले वितरण जाळे आणखी बळकट करून तसेच नवीन वाहने बाजारात आणून यंदा 25 हजार मोटारींची विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

गेल्या वर्षभरात कंपनीने 10 हजार मोटारींची विक्री केलेली असली तरी ते स्थित्यंतराचे वर्ष होते. काही विभागांत कंपनीचे अस्तित्वही नाही; परंतु तरीही एक टक्का बाजारहिस्सा नोंदवण्याचा कंपनीचा विचार असून 25 हजार मोटारींची विक्री यंदाच्या वर्षात करण्याचा मानस फियाट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एन्रिको अटॅनासियो यांनी व्यक्त केला. वितरण केंद्राची महत्त्वाकांक्षी विस्तार योजना राबवताना ही संख्या मार्चपर्यंत 65 आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत 100 पर्यंत वाढवण्याचा मनोदय त्यांनी या वेळी व्यक्त केला. ग्रँड पुंतो हॅचबॅक आणि लिनेआ सेडान या दोन मोटारींची विक्री करीत असलेल्या फियाट इंडियाने आपला जीप ब्रँड 2014 मध्ये भारतात आणण्याची घोषणा अगोदरच केली आहे; पण त्याच वेळी ग्रँडे पुंतो या हॅचबॅकची सुधारित आवृत्ती तसेच लिनेआ क्लासिक सेडान 2015 पर्यंत बाजारात आणण्याचा विचार करीत आहे.

रांजणगाव प्रकल्पाची क्षमता वाढवणार
फियाट इंडियाच्या पुण्याजवळ असलेल्या रांजणगाव प्रकल्पाची सध्या वर्षाला 1 लाख 30 हजार मोटारींचे उत्पादनाची क्षमता असून ती दोन लाख मोटारींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.