आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fiat Car News In Marathi, Automobile Industry, Divya Marathi

‘फियाट’चा धडाका, चार नव्या कार आणणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन बाजारातील मंदीची तमा न बाळगता मोटार उद्योगातील फियाट या कंपनीने डिसेंबरपर्यंत चार नवीन मोटारी बाजारात आणण्याचा निर्धार केला आहे. यापैकी फियाट लिएना अलीकडेच बाजारात दाखल झाली असून आणखी तीन कार पुढील आठ ते नऊ महिन्यांत दाखल होत आहेत. इतकेच नाही तर कंपनीने आपले वितरण जाळेदेखील भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे.


चेहरामोहरा बदललेली नवी फियाट लिएना बाजारात आल्यानंतर आता अबार्थ 500, अ‍ॅव्हेंच्युरा आणि पुंटो या आणखी तीन मोटारी वाहन बाजारात येण्यासाठी सज्ज होत असल्याचे फियाट क्रायस्लरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नागेश बसावनहल्ली यांनी दादरमधील प्रभादेवी येथे सुरू करण्यात आलेल्या नव्या वितरण केंद्राच्या अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले.


दिल्लीतील ऑटो एक्स्पो प्रदर्शनात सादर करण्यात आलेली ‘अबार्थ 500’ ही लहान मोटारींमधील लोकप्रिय रेसिंग मोटार म्हणून ओळखली जाते. ही मोटार डिसेंबरपर्यंत त्याचप्रमाणे नवीन अ‍ॅव्हेंच्युरा आणि नवीन पुंटो डिसेंबरपर्र्यंत बाजारात येण्याची शक्यता बसावनहल्ली यांनी या वेळी व्यक्त केली.


याच महिन्यात बाजारात आलेल्या नव्या लिएनामुळे मध्यम आकाराच्या सेडन मोटारींच्या वर्गातील आमचे स्थान उंचावले आहे. या मोटारीच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत ही फियाट क्रायस्लरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळेच आम्ही आमचे वितरण जाळेही मजबूत करत आहोत. सध्या वितरण केंद्रांची संख्या 108 असून डिसेंबरपर्यंत आठ प्रमुख शहरांमध्ये ही संख्या 150 पर्यंत नेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
दादरमधील मोतीलाल ओस्वाल टॉवरमध्ये ‘एस्के मोटर्स’च्या 8500 चौरस फूट जागेवर उभारण्यात आलेल्या या नव्या शोरूममध्ये अबार्थ 500, लिएना आणि अ‍ॅव्हेंच्युरा या तीन मोटारी प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत.