आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फियाटची ‘लिनिआ टी - जेट’ सेडान बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दोन वर्षांपूर्वी ‘लिनिआ टी - जेट’ ही सेडान गटातील आलिशान मोटार फियाटने बाजारात दाखल केली होती. परंतु मध्यम आकाराच्या सेडान मोटारींकडे ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन आता फियाटने याच मोटारीची सुधारित आवृत्ती बाजारात सादर केली आहे.


अ‍ॅक्टिव्ह, डायनॅमिक आणि इमोशन अशा तीन प्रकारांत नवीन ‘लिनिआ टी - जेट’ बाजारात आली आहे. या मोटारीतील बहुतांश वैशिष्ट्ये ही अगोदरच्या लिनिआसारखीच असली तरी ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर आणि रिमोटसह ऑडिओ सिस्टिम या नवीन वैशिष्ट्यांचा समावेश यात करण्यात आला आहे. सुरुवातीला प्रमुख आठ शहरांमध्ये ही मोटार उपलब्ध करून देण्यात येणार असून नंतर ती अन्य शहरांमध्ये उपलब्ध होईल असे फियाट क्रिसिलर ऑपरेशन्स इंडियाचे अध्यक्ष नागेश बसवनहल्ली यांनी सांगितले.


‘लिनिआ टी - जेट’ची फीचर्स
० चार डिस्क ब्रेक, ड्युएल एअरबॅग्ज, आगप्रतिबंधक योजना
० दुहेरी रंगसंगती असलेला क्रोम अ‍ॅक्सेंट डॅशबोर्ड
० मनोरंजनासाठी अभिनव ब्ल्यू अ‍ॅँड मी तंत्रज्ञान
० वॉरंटी : 1,00,000 किलोमीटर आणि तीन वर्षे
० पाच आकर्षक रंगांत उपलब्ध : ओशनिक ब्ल्यू, डस्कन वाइन, मिनिमल ग्रे, न्यू पर्ल व्हाइट, हिप हॉप ब्लॅक
० किमत : टी जेट अ‍ॅक्टिव्ह : 7,87,272 रु., टी जेट डायनॅमिक : 8,73,150 रु. , टी जेट इमोशन : 9,11,501 रु. (एक्स शोरूम मुंबई)