आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणुकीच्या लेखी नियोजनाचे पाच फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक जण गुंतवणुकीचे लेखी नियोजन करणे टाळतात. कारण त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना शिस्त पाळावी लागते. गुंतवणुकीची योजना आपल्या डोक्यात आहे, मग ते लिहून का काढायचे? असाही काही जण विचार करतात. मात्र, गुंतवणुकीचे लेखी नियोजन नसेल तर गुंतवणूक पद्धतीवर बहुतेकांचे लक्ष केंद्रित होत नाही. त्यामुळे निर्णायात व्यावहारिक पातळीवरील पक्षपात दिसून येतो. गुंतवणुकीसाठी लेखी नियोजनाचे पाच फायदे आहेत, ते असे...
1. उद्दिष्ट आणि धोरण स्पष्ट होते : गुंतवणुकीची लेखी योजना बनवल्यास आपले उद्दिष्ट काय आहे आणि ते साध्य करण्याचे धोरण कसे आहे हे स्पष्ट होते. याचप्रमाणे जोखमीनुसार पोर्टफोलिओत कोणत्या मालमत्ता वर्गाचा समावेश असावा हेही समजून येते. विशिष्ट मालमत्ता वर्गात (असेट क्लास) केव्हा गुंतवणूक करायची व केव्हा त्यातून बाहेर पडायचे हेही कळते.
2. योजनेची अंमलबजावणी सुलभ होते : प्रत्येक कंपनी किंवा व्यवसायात काही मानवी प्रक्रिया किंवा शिष्टाचार पाळणे आवश्यक असते. निर्णय घेताना व्यावहारिक आणि भावनात्मक पक्षपात होऊ नये यासाठी हे शिष्टाचार असतात. गुंतवणुकीची योजना लेखी स्वरूपात समोर असेल तर केव्हा, कोठे आणि कशी गुंतवणूक करायची हे लक्षात येते.
3. सक्रियता वाढते : जेव्हा तुम्ही गुंतवणुकीची लेखी योजना तयार करता तेव्हा त्यातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही जास्त सक्रिय होता. उदाहरणार्थ- कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे, केव्हा त्यातून बाहेर पडायचे आहे, आपल्या जोखमीनुसार पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे हे सर्व लक्षात येते.
4. नफा मिळवण्यासाठी होते मदत : वित्तीय सल्लागार नफा कसा मिळवायचा याचाही सल्ला देतात.गुंतवणुकीच्या लेखी योजनेत असेट अलोकेशनच्या धोरणाचा स्पष्ट उल्लेख असावा. दरवर्षी ते संतुलित करणे, त्याची पडताळणी करण्याची गरज असते. जेव्हा तुम्ही असेट अलोकेशन पुन्हा संतुलित करता तेव्हा आपोआप नफा वसूल होतो. यामुळे वाढणाºया मालमत्ता वर्गातून नफा कमावणे तसेच त्यात गुंतवणूक करणे सोपे जाते. तसेच जास्त किमतीवर विक्री करणे आणि कमी किमतीवर खरेदी करण्याचा नियम आपोआप लागू होतो.
5. गुंतवणुकीचे पूर्ण चित्र समोर राहते : समजा गुंतवणुकीची लेखी योजना समोर नसेल तर अनेक बाबींकडे दुर्लक्ष होऊ शकते. एखादा निर्णय इतर गुंतवणुकीच्या निर्णयावर परिणाम करू शकतो. उदाहरणार्थ, मुलांचे शिक्षण आणि लग्न यासाठी बचत करणे महत्त्वाचे आहे. मात्र, उत्पन्नाचा मोठा हिस्सा केवळ या बचतीसाठीच वापरला तर इतर बचतीवर त्याचा परिणाम होईल. हे कसे होते हे माहिती होण्यासाठी लेखी योजना गरजेची ठरते.
अशा प्रकारे गुंतवणुकीची लेखी योजना तयार केल्यास विविध परिस्थितीत कशी गुंतवणूक करायची यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास मदत होते.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.