आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIIs Invest Rs 7500 Cr In Indian Stock Market In May So Far

विदेशी गुंतवणूकदार संस्थांची 7,500 कोटींची गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक आणि राजकीय चिंतेचे वातावरण असतानाही विदेशी गुंतवणूकदारांनी समभाग बाजारपेठेत पुन्हा एकदा नव्याने स्वारस्य घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या गुंतवणूकदारांकडून भांडवल बाजारात सातत्याने निधीच्या ओघामुळे सेन्सेक्सलाही 20 हजारांचे शिखर गाठता येणे शक्य झाले आहे. या गुंतवणूकदारांनी मे महिन्यात 7,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

या गुंतवणुकीबरोबरच देशातील समभाग बाजारपेठेत विदेशी थेट गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या प्रारंभापासून एकूण 68,561 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन ते दहा मे या कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी 22,829 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली, तर 15,306 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. परिणामी बाजारात एकूण 7,525 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाल्याचे भांडवल बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. समभाग बाजारपेठेबरोबर कर्ज बाजारपेठेत याच कालावधीत 8,417 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक आली. कर्ज बाजारपेठेत यंदा एकूण 26,495 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

वास्तविक विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या गुंतवणुकीने एप्रिल महिन्यात 16 महिन्यांचा नीचांक गाठला होता. या महिन्यात भांडवल बाजारपेठेत या गुंतवणूकदारांकडून 5,414 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. जागतिक बाजारपेठेतील रोकड सुलभतेची स्थिती हे सध्याच्या भांडवलाचा ओघ बाजारात येण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. त्याचप्रमाणे सोने आणि कच्च्या तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्यामुळे चालू खात्यातील तूट कमी झाली आहे.