आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरणीला अखेर लगाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीतही वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भक्कम स्थितीत असलेला युरोप शेअर बाजार तसेच स्टेट बँक, ओएनजीसी यांच्यासह अन्य बड्या समभागांची चांगली खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सचा पारा एक महिन्याच्या नीचांकी पातळीवरून पुन्हा वर गेला. खरेदीच्या पाठबळामुळे सेन्सेक्स ३४ अंकांची वाढ नोंदवत २७,८३१.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजरातील निफ्टीच्या निर्देशांकातदेखील १४.९५ अंकांनी सुधारणा होऊन तो ८३५५.६५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. स्थानिक पातळीवर कोणत्याही ठोस घडामोडी नसल्याने बाजारात नरमाई होती, परंतु नंतर मात्र खरेदीचा पाठिंबा मिळून निफ्टी आणि सेन्सेक्स वर गेला. विशेषकरून किरकोळ गुंतवणूकदारांनी द्वितीय श्रेणीतील समभागांची खरेदी केल्यामुळेदेखील बाजाराला आधार मिळाला. सेन्सेक्स काहीसा खालच्या पातळीवर उघडला. आशियाई शेअर बाजारातील संमिश्र वातावरणामुळे तो एका ठरावीक श्रेणीत फ‍िरत होता, परंतु खरेदीचा माहोल निर्माण झाल्यामुळे सेन्सेक्स दिवसअखेर ३४.०९ अंकांनी वाढून २७,८३१.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्स ७६५.८१ अंकांनी घसरला होता. सार्वजनिक कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी आल्याचे रेलिगेअर सिक्युरिटीजच्या किरकोळ वितरण विभागाचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी सांगितले.

टाॅप गेनर्स : एसबीआय, ओएनजीसी, टाटा पॉवर, टाटा मोटर्स, सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब, हीरो माेटाेकाॅर्प
टाॅप लुझर्स : भेल, गेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज ऑटो, लार्सन अँड टुब्रो