आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finance Minister Relaunches The Varishtha Pension Bima Yojana (Vpby)

ज्येष्ठ नागरिकांसाठी पेंशन विमा योजना सुरू, प्रत्येक महिन्याकाठी मिळतील पाच हजार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 'ज्येष्ठ पेंशन विमा योजना' पुन्हा एकदा सुरु केली आहे. या माध्यमातून देशातील ज्येष्ठ नागरिकांना महिन्याकाठी पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत पेंशन मिळणार आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2014 ते 14 ऑगस्ट 2015 या मर्यादित काळासाठी सुरु करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2014-15 च्या अर्थसंकल्पीय भाषणात ज्येष्ठ पेंशन विमा योजनेचा प्रस्ताव ठेवला होता. 60 वर्ष ते त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 15 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2015 या मर्या‍दित काळासाठी पेंशन विमा योजना पुन्हा सुरु केली जाणार असल्याचे जेटली यांनी म्हटले होते. एनडीए सत्तेत येण्यापूर्वी युपीए सरकारने देखील 2003-04 मध्ये या योजनेचा प्रस्ताव ठेवला होता. या योजनेसाठी एलआयसीसोबत करार करण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सव वाचा पेंशन विमा योजनेची वैशिष्ट्ये...