आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finolex PVC Pipes Industries New Plant In Gujrat

फिनोलेक्सचा गुजरातमधील प्रकल्प झाला कार्यान्वित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पीव्हीसी पाइप्सचे देशातील सर्वात मोठे उत्पादक असणार्‍या फिनोलेक्स इंडस्ट्रीजचा गुजरातमधील मासार (बडोद्याजवळ) येथील प्रकल्प कार्यान्वित झाल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. या प्रकल्पासाठी कंपनीने शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून पहिल्या टप्प्यात तीस हजार टन (टीपीए) उत्पन्नाची भर कंपनीच्या एकूण उत्पादनात पडणार आहे, अशी माहिती कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष प्रल्हाद छाब्रिया यांनी दिली.
महाराष्ट्रात याआधीपासून फिनोलेक्सचे दोन प्रकल्प पुणे आणि रत्नागिरी येथे कार्यरत आहेत, असे सांगून छाब्रिया म्हणाले, हा नवा प्रकल्प उभारण्याबाबत गुजरात सरकारशी व्हायब्रंट गुजरात 2011 परिषदेदरम्यान सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला होता. त्यानुसार मासार येथे 29 एकर जागेवर या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राबाहेरील कंपनीचा हा पहिलाच प्रकल्प आहे. गुजरातमधील या प्रकल्पामुळे उत्तरेकडील
राज्यांतील कृषी व रिअल इस्टेट बाजारपेठांची वाढती गरज पुरवणे सोयीचे होणार आहे.