आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध कंपन्यांचे नऊ एफडीआय प्रस्ताव मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय औषधी कंपन्यांत गुंतवणुकीबाबतच्या नऊ थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) प्रस्तावाला शुक्रवारी हिरवा कंदील मिळाला. विदेशी व्यापार प्रोत्साहन मंडळाने तीन प्रस्ताव प्रलंबित ठेवले. आर्थिक व्यवहार सचिव अरविंद मायाराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण 30 एफडीआय प्रस्तावांवर चर्चा झाली.

त्यापैकी 10 प्रस्ताव औषधनिर्माण क्षेत्रातील आहेत. यात सिंगापूर स्थित ग्लॅस्कोस्मिथलाइन, अमेरिकेतील मायलॅन, मॉरिशस येथील कास्टलेचॉन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, मुंबईतील फेरिंग थेरापेटिक्स आणि हैदराबादेतील वरडॅँट लाइफ सायन्सेस यांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. औषधनिर्माण क्षेत्रात 100 टक्के एफडीआयला नुकतीच सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, सध्या ज्या विदेशी कंपन्यांचा भारतीय कंपन्यांत हिस्सा आहे त्यांना मात्र मंडळाची अनुमती घ्यावी लागते.