नवी दिल्ली - विदेशी गुंतवणूक व प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) सहा प्रस्तावांना गुरुवारी हिरवा कंदील दाखवला. यातून 551 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
अर्थ सचिव अरविंद मायाराम यांच्या अध्यक्षतेखाली एफआयपीबीची बैठक झाली तीत एफडीआयच्या सहा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात मॉरिशस येथील डेस्टिमनी एंटरप्रायर्सच्या 489.99 कोटींच्या प्रस्तावाचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँक गृह वित्त लिमिटेडमधील हिस्सा विक्रीसंबंधीची ही गुंतवणूक आहे.